Awareness about Corona through hymns bhajan 
कोल्हापूर

कोरोना निर्माण केला कोणी, कसला विचार त्यांच्या मनी...

तानाजी बिरनाळे

मांगूर (बेळगाव) - आज संपूर्ण जगालाच कोरोनाने विळखा घातला आहे. तो आता गल्लीपर्यंत येऊन पोहोचला आहे. त्यापासून सर्वांचे संरक्षण व्हावे, यासह जनजागृतीसाठी भजनाच्या माध्यमातून मांगूर (ता. निपाणी) येथील ग्रामीण साहित्यिक लक्ष्मण कमते यांच्या पुढाकाराने गुरुकृपा भजनी मंडळाकडून प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहे.
शासनाने कोरोनापासून बचावासाठी लॉक डाउनच्या माध्यमातून अनेक नियमावली अंमलात आणून जनतेने सोशल डिस्टन्सिंग पाळावेत, यासाठी अनेक प्रयत्न चालविले आहेत. ही नियमावली सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावी, यासाठी मांगूरमधील ग्रामीण कथाकार लक्ष्मण कमते हे गुरूकृपा भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत.

सध्या त्यांनी तयार केलेली 'घर परिसर स्वच्छतेत नटवा, कोरोना व्हायरसला जगातून हटवा', 'कोरोना निर्माण केला कोणी, कसला विचार त्यांच्या मनी', 'आला कोरोना शहरात, धडकी भरली उरात', 'जीव प्रत्येकाच्या मुठीत धरी, जो तो मरणाच्या वाटेवरी', 'विनवून सरकार सांगे ऐकत का नाही, जीवाची पर्वा तुम्हा आहे की नाही', 'आला कोरोना देशात, नाही खचून जायाच, कोरोना संगे आम्ही सर्वांनी लढायचं', अशी भजनगीते सोशल मीडियावर झळकत आहेत. त्यांच्या कोरोनाविषयी जनजागृतीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेत त्यांना गोटू टोपे, ईश्वर कमते, दत्ता कमते, लखन कमते, एकनाथ टोपे, अनिल पाटील, आनंदा केनवडे, युवराज केनवडे, अभिनंदन कमते, त्रिवेणी कमते, सागर हेगडे यांच्यासह साथीदारांचे सहकार्य मिळत आहे.

स्वर अन तालाची मैफील

स्वर आणि तालाच्या मैफिलीतून कोरोना जनजागृतीपर भजनांना चांगलाच रंग आला आहे. त्यातून ऐन लॉक डाऊनच्या काळात योग्य प्रबोधन व रसिकांचे मनोरंजन देखील होत आहे.


'आज संपूर्ण देशभर कोरोनाने कहर केला आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत सर्वच स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत जनजागृती व्हावी, यासाठी गुरूकृपा भजनी मंडळाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. त्यास नागरिक व रसिकांचा प्रतिसाद मिळत आहे.'

- लक्ष्मण कमते, ग्रामीण साहित्यिक, मांगूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ravindra Waikar: रवींद्र वायकर यांच्यामागचा त्रास गेला! जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद; गैरसमजातून गुन्हा दाखल केला...

Ajit Pawar: शिंदे असतानाही अजित पवारांना सोबत का घेतलं? विनोद तावडेंनी भाजपची स्टॅटर्जी सांगितली

Latest Maharashtra News Updates : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींनी केला फोन, काय आहे कारण?

मतदानाला जाताना मोबाईल घेवून जावू नका! मतदान करतानाचा व्हिडिओ केल्यास दाखल होणार गुन्हा; ‘ईव्हीएम’वर लक्ष ठेवण्यासाठी केंद्राध्यक्षांना सतर्क राहण्याच्या सूचना

शेतकऱ्यांना उजनी धरणातून मिळणार वाढीव पाणी! समांतर जलवाहिनी झाल्यावर भीमा नदीतून सोलापूर शहरासाठीचे पाणी होणार बंद; उजनी धरणातील पाणीवाप कसे? वाचा सविस्तर...

SCROLL FOR NEXT