Instagram  Sakal
कोल्हापूर

‘बघा-आबा’ सौदीतून कोल्हापुरात

पेजरचे नाव, चेहरा गुलदस्त्यात; ‘इन्स्टाग्राम’वरील रांगड्या भाषेच्या पेजचे १ लाख ३० हजार व्ह्यूवर्स

लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : आपला चेहरा न दाखविता, नाव प्रसिद्ध न करता केवळ कोल्हापुरातील म्हणून सौदी अरेबियात (Saudi Arabia) असलेल्या तरुणाकडून ‘बघा- आबा’ या नावाने इन्स्टाग्रामवर (Instagram) पेज चालविण्यात आले. याला तब्बल १ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूवर्स आहेत. पेजवर कोल्हापूरच्या (Kolhapur) बोलीभाषेतील शब्द, येथील संस्कृती, फुटबॉल, डान्स आणि कुस्ती, रंकाळ्यासह इतर बऱ्याच गोष्टी पहावयास मिळतात. एका वेगळ्या शैलीत कधी मिम्सच्या माध्यमातूनही मनोरंजनाचा हा खजाना आता अमेरिकेसह (America) रशिया, दुबई, कोरिया, हाँगकाँगपर्यंत पोचला आहे. हाच तरुण आता सौदीतून कोल्हापुरात दाखल झाला आहे. येथून पुढे कुस्तीपंढरीसह कोल्हापुरातील संस्कृती सर्वांना दाखविण्याचा त्याचा मानस आहे.

मूळचा कोल्हापूर परिसरातील ग्रामीण भागातील हा तरुण. दहावीनंतर आई-वडिलांचे छत्र हरपले म्हणून त्याने थेट सौदी अरेबिया गाठले. नऊ वर्षे तो तेथेच राहिला. मात्र, कोल्हापुरातील रांगडी भाषा, येथील पांढरा-तांबडापासून तो दूर गेला नाही. कोल्हापूरची आठवण जपत त्याने २०१७ मध्ये ‘इन्स्टाग्राम’ या सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘बघा-आबा’ हे पेज सुरू केले. कोल्हापुरात ‘बघा आबा तुम्ही काय करता..’ असे सहज म्हटले जाते. त्यातूनच त्याने हेच नाव पेजला दिले. सुरुवातीला केवळ ८६ व्ह्यूवर्स होते.

त्यामुळे पेज बंद केले. २०१८ मध्ये मित्राने दिलेल्या टिप्सनुसार पिवळा-काळा रंगाचे मिश्रण करून कोल्हापुरातील रांगडे शब्द वेगळ्या फॉन्टमध्ये पेजवर देण्यास सुरुवात केली. काही मिम्स (ताज्या घडामोडीवरील विनोदी व्हिडिओ) पेजवर दिले. यातून पुढे महिन्यात दहा हजारांहून अधिक व्ह्यूवर्स झाले. पुढे कोल्हापुतील विषयावर भाष्य करणे, टीका कारणाऱ्यांना उत्तर देणे, कोल्हापुरातील रांगडे शब्द आणल्यामुळे पेजने चांगलीच पकड धरली.

सौदीमध्ये सेफ्टी फायर मनचा कोर्स करून तेथेच राहणाऱ्या या तरुणाने तेथे मित्रांसोबत तांबडा रस्सा केला, मटण शिजविले. तरीही ते या पेजवर येत होते. तेथील मॉल, तेलाच्या खाणींसह सौदीतील अनेक बाबींचे दर्शन त्याने पेजच्या माध्यमातून घडविले. एवढंच नव्हे तर कोल्हापूरचे नाव कलापूर करा म्हणणाऱ्या कलाकारांवरही मिम्सच्या माध्यमातून टीका केली.

मोबाईल कव्हर, किचेनवरही ‘बघा आबा’

हॉटेल, मॉल, पर्यटन महोत्सव, एवढंच नव्हे, तर सोशल मीडियावरील स्टेटस आणि स्टोरीवरही ‘बघा आबा’ झळकू लागला. मोबाईल हॅण्डसेटचे कव्हर, किचेनवरही बघा आबा दिसू लागला आहे. नुकताच नऊ वर्षांची नोकरी सोडून हाच आबा आता कोल्हापुरात दाखल झाला आहे. कोल्हापुरातच तो व्यवसाय करणार आहे. पेजचे व्ह्यूवर्स वाढत असले तरीही त्याने आपले नाव आणि चेहरा आजपर्यंत गुलदस्त्यात ठेवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात कोणी घेतली आघाडी ? भाजप विरुद्ध शरद पवार गटात थेट लढत

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळमध्ये सुनील शेळके यांची दणदणीत आघाडी

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT