Vishalgad Violence esakal
कोल्हापूर

Vishalgad Violence : विशाळगड हिंसाचार प्रकरणी 24 पैकी 17 जणांना जामीन मंजूर; कोर्टाने 7 जणांचा जामीन फेटाळला

Vishalgad violence : विशाळगड (Vishalgad) हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल केला होता.

सकाळ डिजिटल टीम

गोकुळ शिरगांव, इचलकरंजी, पुण्यातील काही कार्यकर्त्यांचा मंजूर करण्यात आल्याचं कळतंय.

Vishalgad Violence : काही दिवसांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड (Vishalgad) हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत राज्यसभेचे माजी खासदार संभाजीराजे यांच्यासह 500 जणांवर गुन्हा दाखल केला होता आणि 24 जणांना ताब्यात घेतलं होतं.

दरम्यान, आता न्यायालयाने 24 पैकी 17 जणांना जामीन मंजूर केला, तर 7 जणांचा जामीन जिल्हा न्यायालयानं (Kolhapur District Court) फेटाळला असल्याची माहिती आहे. गोकुळ शिरगांव, इचलकरंजी, पुण्यातील काही कार्यकर्त्यांचा मंजूर करण्यात आल्याचं कळतंय.

चेतन जाधव, आदित्य उलपे, ओंकार साबळे, कटकधोंड, ओंकार चौगुले, सूरज पाटील, ओंकार रजपूत या सात जणांचे घटनास्थळावरचे फोटो मिळाल्याने यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवावे, यासाठी आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र, संभाजीराजेंच्या आंदोलनापूर्वीच विशाळगड परिसरात हिंसाचार झाला. यामध्ये स्थानिक नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं.

विशाळगडावर काय घडलं होतं?

विशाळगड गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. माजी खासदार संभाजीराजेंनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मागणी केली होती. इतकंच नाही तर त्यांनी 'चलो विशाळगड' अशी हाक देत आंदोलनाचा इशारा देखील दिला होता. मात्र, त्याआधीच विशाळगडावर हिंसाचाराची घटना घडली. आंदोलकांनी विशाळगडावरील घरे आणि दुकानांची जाळपोळ केली होती. यात स्थानिक नागरिकांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी संभाजीराजेंसह 500 जणांवर गुन्हा दाखल केला होता, तर 24 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT