Kolhapur Barki Waterfall sakal
कोल्हापूर

Kolhapur Barki Waterfall : पर्यटक ‘फुल्ल’ अन् बर्की हाऊसफुल्ल !

हुल्लडबाज, नशाखोरांना रोखणे आवश्यक

सकाळ वृत्तसेवा

Kolhapur Waterfall: जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील बर्की धबधबा हा वर्षा पर्यटनांचे प्रमुख केंद्र बनले आहे. त्यामुळे मुसळधार पावसात पर्यटकांचे लोंढे वर्षा पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी बर्कीकडे वळतात. यंदा प्रत्येक दिवशी २ ते ३ हजार, तर सुटीचा मोका साधून त्या दिवशी तब्बल सात ते दहा हजार पर्यटक या धबधब्याला भेट देत आहेत; पण यामुळे बर्की हाऊसफुल्ल आहे.

मात्र, बहुतांशी पर्यटक ‘तर्रर्र’ अवस्थेत नशेत हुल्लडबाजी करत आहेत. त्यामुळे वादावादीच्या व छोट्या-मोठ्या अपघाताच्या घटना घडत आहेत. बर्की म्हटलं की कोसळणारा पाऊस, बोचरी थंडी, प्रवासात इरलं घेऊन चिखल गुट्टा करत चाललेली रोप लागण असेच दृश्य सामोरे येते.

धबधबा पाहून परत आल्यानंतर घरोघरी चुलीवर रटरटणारा मटणाचा रस्सा आणि चुलीवर भाजलेली नाचणीची भाकरी अक्षरशः पंचतारांकीतमधील डिशेसवर मात करत आहेत. मात्र, हल्ली धबधब्याचा आनंद घेण्यापेक्षा हुल्लडबाजांचीच येथे चलती जास्त आहे.

गावात प्रवेश करताच ‘सखाराम’ या प्रवेशकर घेणाऱ्या व्यक्तीने ओळख सांगताच ‘साहेब, जरा हुल्लडबाजांना समजावून सांगा’ असे अर्जव केले. तोपर्यंत समोरच एका पर्यटकाने प्रवेशकर कशाबद्दल द्यायचा? असे धमकी देतच जाब विचारला.

गावातून धबधब्याकडे चालत जाताना पाण्याच्या मोकळ्या बाटलीतून आणलेले मद्य खुलेआम रिचवत रिचवत जाणारी टोळकी, मध्येच सिगारेटचे कश मारत येणा-जाणाऱ्यांच्या तोंडावर धूर सोडणारे ‘धुरंधर’, बाटल्या मोकळ्या झाल्याकी झुडपात फेकून मोकळे होतात. एरवी पडलेल्या झाडाच्या लाकूट फाट्याला हात लावू न देणारा आणि प्रवेश करातला ३० टक्के वाटा घेणाऱ्या वनविभागाचे येथे अस्तित्वच जाणवत नाही.

खरे तर सुटीच्या दिवशी पोलिस बंदोबस्त एन्ट्री पाँईटला असतो. येथून लपवून दारू नेली जाते आणि धबधब्याच्या मार्गावर मग बेभान झालेल्या लोकांच्या किळसवाण्या, अश्‍लील आरोळ्यांचा कहर होतो. म्हणूनच अचानक पोलिसांनी धाडी टाकून हुल्लडबाजांना, नशेखोरांना अद्दल घडवावयास हवी. तरच येथे शिस्त लागेल; अन्यथा एक दिवस मोठी विचित्र घटना घडल्यास नवल वाटू नये.

दृष्टिक्षेपात

  • प्रत्येकी १०० रुपये देऊन बोटीनेही धबधब्याजवळ जाण्याची व्यवस्था

  • ६६८ लोकसंख्येच्या गावच्या विकासासाठी प्रत्येकी १० रुपये प्रवेश शुल्क

  • मटण-मसाला घेऊन आल्यास जेवण तयार करायला व भाकरी, भात यास १५० रुपये

  • हा धबधबा हुल्लडबाजामुळे महिलांसाठी किती सुरक्षित राहिला हा कळीचा मुद्दा

  • महिला-मुलींनी येताना ड्रेसच्या मर्यादा पाळूनच गर्दीत जावे

  • महिलांसाठी चेंजिंग रूमची आवश्यकता

  • दारूच्या मोकळ्या काचेच्या बाटल्या, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या यांचा झाडाझुडपात खच

  • यावर्षी धरणापर्यंत डांबरी झाल्याने चालण्याचे अंतर झाले दीड कि.मी. ने कमी.

  • गेल्या रविवारी (ता. १६) सर्वांत उच्चांकी २०,००० पर्यटकांची भेट

अपुरे पोलिस बळ असल्याने धबधबास्थळी नियमित बंदोबस्तासाठी मर्यादा येत आहेत. यापुढे साध्या वेशातील पोलिस ठेवण्याबरोबरच वारंवार अचानक तपासणी करून हुल्लडबाज, नशेखोरांना पोलिसी खाक्या दाखवू. तसेच त्यांच्यावर गुन्हे नोंद करणार.

- राजेंद्र सावंत्रे, पोलिस निरीक्षक, शाहूवाडी पोलिस ठाणे

आठवडाभरापूर्वीच मी कार्यभार स्वीकारला आहे. मात्र, यापुढे वनविभागाच्या हद्दीत कचरा करणाऱ्यांवर वनकायद्यांतर्गत गुन्हे दाखल करणार.

- सुषमा जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी, पेंडागळे

२००१ पासून धबधबा नावारूपास आला. मात्र, हल्ली धबधब्याचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी आणि दंगा, मस्ती, नशाबाज यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक झाली आहे. प्रवेश करातील ७o टक्के रक्कम गावच्या विकासासाठी कामी येण्याचे नियोजन केले आहे.

- आनंदा पाटील, अध्यक्ष, बर्की ग्रामदान मंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: अजितदादांच्या राष्ट्रवादीचा फडणवीसांना CM पदासाठी पाठिंबा! शिंदेंसाठी दोन पर्याय कोणते? राजकारणातील मोठे संकेत

Bajarang Punia: कुस्तीपटू बजरंग पुनियावर चार वर्षांची बंदी! नेमकं काय घडलंय?

Sakal Podcast : बंद होणार जुनं पॅनकार्ड! ते दिग्दर्शक नागराज मंजुळेंना समन्स

Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Amit Thackeray: 'हे फक्त शब्द नाहीत तर इशारा आहे !' अमित ठाकरेंची पोस्ट 'या'मुळे चर्चेत

SCROLL FOR NEXT