कोल्हापूर : अहो, घ्या की पेरू घ्या, फोड खाऊन तर बघा, लालभडक, पांढरीफेक पेरुची फोड गोड हा घ्या!, असा आवाज देत अनेक पेरू विक्रेते फिरत असतात. गोकुळ हॉटेल ते शाहूपुरी ही गल्ली अलीकडे पेरू गल्ली म्हणून नावारूपाला आली आहे. अनेकजण दिवसभर पेरू घेण्यासाठी या गल्लीत येतात. १० ते १५ वर्षांपूर्वी पेरुची विक्री इतकी नव्हती. आज अनेक जातींचे पेरू मिळतात.
दररोज सकाळी शाहूपुरीतील गल्लीत सांगली, सोलापूर भागातून ४० कॅरेटस् (करंड्या) भरून पेरू येतात. या पेरुचे अर्थकारण प्रबळ झाले असून, अनेक विक्रेत्यांना यातून उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. शहरात शाहूपुरी, कपिलतीर्थ मार्केट, घाटी दरवाजा, लक्ष्मीपुरी, बस स्थानक आदी परिसरात सर्वाधिक पेरुचे विक्रेते आहेत. दररोज ५०० ते एक हजार रुपये पेरुची उलाढाल होते. यातून महिन्याला लाखो रुपयांचे अर्थकारणाला गती येते. पेरुच्या झाडाला एप्रिल-मे, सप्टेंबर-ऑक्टोबरच्या हंगामात फुले येतात. नंतर तो पक्व होतो.
हेही वाचा- अकरावी विज्ञान शाखेसाठी यंदा दहाच विद्यार्थ्यांची वाढ, मुदतवाढीनंतर पार झाला गतवर्षीचा आकडा
पेरू वर्षभर उपलब्ध असणारे फळ आहे. भारतात सात ते नऊ टक्के क्षेत्रावर पेरुची लागवड होते. पेरुची उत्तर प्रदेशात जास्त लागवड होते. महाराष्ट्रात सुमारे ३० ते ४० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड होते.पेरुचे विविध वाण पेरुच्या सरदार (L-४९) वाणाला जास्त मागणी आहे. अलाहाबाद सफेदा, चित्तीदार, लखनौ-४२, सुप्रीम, पिन्क इंडियन हरिजा, थायलंड पेरू, सरदार लखनौ (लांब पेरू), देशी पेरू विक्रीस आले आहेत.
पेरू कोठून येतो
अडग, बेडग (जि. सांगली), उमळवाड (कुरुंदवाड), मालगाव, मायणी (जि. सातारा)
पेरू खाण्याचे फायदे
मानसिक थकवा दूर होऊन ऊर्जा मिळते ‘क’ जीवनसत्त्व, ग्लुकोज, टॅनिन ॲसिड घटकांमुळे जेवण पचते
पेरुची भाजी, जाम, कोशिंबीर, चटणी, रायते, मुरंबाही करता येतो
अ-रुची, भूक मंदावणे, आम्लपित्तावर गुणकारी
मलावरोधा त्रास कमी होतो, पोट साफ होते
दंतविकार, हिरडयांची सूज, मुख विकार दूर होतात
‘दररोज शाहूपुरीच्या गल्लीत गाडी लावतो. संध्याकाळपर्यंत पेरुंची विक्री होते. दरही वाजवी आहेत. सर्व वयोगटातील लोक आवडीने पेरू खातात. मी २५ वर्षे या जागेवर पेरू विक्री करतो.’
- मुस्तफा बागवान, पेरू विक्रेते
संपादन - अर्चना बनगे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.