hupari municipality sakal media
कोल्हापूर

"...तर लठ्ठेंचे नगरसेवकपद रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही"

नगराध्यक्ष गाठ यांच्यासह सत्ताधारी नगरसेवकांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा

हुपरी : पक्षप्रतोद, उपनगराध्यक्ष यांसारखी महत्त्वाची पदे देऊनही पक्ष नेतृत्वाशी प्रतारणा करण्याचे पाप भरत लठ्ठे यांनी केले. वैयक्तिक स्वार्थासाठी शहराच्या विकासकामांना खो घालण्याची त्यांची वृत्ती जुनीच आहे. अशा अप्‌प्रवृत्तीला सत्तेवरून खाली खेचणे गरजेचे होते. त्यासाठीच अविश्वास ठराव आणून उपनगराध्यक्ष पदावरून लठ्ठे यांची हकालपट्टी केली. वेळीच बोध घेऊन त्यांनी सुधारावे, अन्यथा त्यांचे नगरसेवक पदही रद्द करून त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा नगराध्यक्षा सौ. जयश्री गाठ यांच्यासह ताराराणी जिल्हा विकास आघाडी, शिवसेना नगरसेवकांनी पत्रकार बैठकीत दिला.

उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे यांच्यावर सोमवारी (ता. २५) अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. नगराध्यक्षा सौ. गाठ तसेच सत्ताधारी भाजप, ताराराणी आघाडी व शिवसेनेच्या नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट केली. ताराराणी आघाडीचे पक्ष प्रतोद सूरज बेडगे यांनी जीबीएसप्रणालीनुसार शहरातील घनकचरा ठेक्याचे काम चालते. त्यामुळे या कामात गैर कारभार झाल्याचे विरोधकांचे आरोप दिशाभूल करणारे असल्याचे सांगितले. पक्षप्रतोद रफिक मुल्ला, माजी उपनगराध्यक्ष जयकुमार माळगे, स्वीकृत नगरसेवक सुभाष कागले, शिवसेनेचे पक्षप्रतोद पिंटू मुधाळे यांनीही विरोधकांवर टीकेची झोड उठवली. युवा नेते अमित गाठ उपस्थित होते.

उपनगराध्यक्ष आमदार आवाडे, गाठ सांगतील तो

विरोधक कितीही वल्गना करू देत; पण पुढील उपनगराध्यक्ष हा ताराराणी आघाडीचाच होईल. आमदार प्रकाश आवाडे, ज्येष्ठ नेते महावीर गाठ जो निर्णय देतील, तो मान्य असल्याचे नगराध्यक्षा जयश्री गाठ यांच्यासह भाजप, ताराराणी व शिवसेनेच्या १३ नगरसेवकांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: “सध्या धर्म नव्हे, आरक्षण संकटात”; ओबीसींनी वंचितसोबत राहण्याचं आंबेडकरांचं आवाहन

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही स्मृतिभ्रंशाचा आजार; आता ते आमचेच भाषण चोरत आहेत

Rajnath Singh : राहुल गांधी तुम्ही, आता जातगनणेची "ब्लु प्रिंट' जनतेसमोर आणाचं

ST Passengers : लालपरीच्या प्रवाशांत तीन वर्षांत ५० हजाराने वाढ; पुणे विभागाला आणखी १६० बसची आवश्यकता

Pakistan Army: पाकिस्तानच्या लष्करी तळावर दहशतवादी हल्ला! ७ सैनिक ठार, १५ जखमी

SCROLL FOR NEXT