Satej Patil Sakal
कोल्हापूर

भुईबावडा दुरुस्तीचा आराखडा बनवा ; सतेज पाटील यांची सूचना

सतेज पाटील; अधिकाऱ्यांसमवेत घाटरस्त्याची पाहणी

सकाळ वृत्तसेवा

वैभववाडी (रत्नागिरी) : रस्ता खचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणासह भविष्यात घाट वाहतूक सुरक्षितपणे सुरू राहावी, या दृष्टीने भुईबावडा घाटरस्ता (Bhuibawda Ghat Road) दुरुस्तीचा परिपूर्ण आराखडा तयार करा, अशा सूचना राज्यमंत्री सतेज पाटील (Minister of State Satej Patil) यांनी आज येथे अधिकाऱ्यांना दिल्या.

खारेपाटण-गगनबावडा राज्यमार्गावरील भुईबावडा घाटरस्त्याला यापूर्वी असलेली भेग अतिवृष्टीमुळे अधिकच रूंद झाली. तेथे रस्ता खचण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या वाहतूक बंद आहे. पाटील यांनी घाटरस्त्याची पाहणी केली. त्यांच्यासमवेत करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहसीलदार रामदास झळके, वैभववाडी पोलिस निरीक्षक अतुल जाधव, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्री. कुलकर्णी, बजरंग पाटील, भगवान पाटील, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, उदय देसाई, सरपंच दगडू भोसले, सहदेव कांबळे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सारिका कुलकर्णी-जाधव, विभागीय वन अधिकारी सुधीर सोनवणे, विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, गगनबावडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रणजित पाटील होते.

पाटील यांनी भेग पडलेल्या ठिकाणाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना दुरुस्तीविषयीचा आराखडा तातडीने करण्याची सूचना केली. रस्ता खचण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी काँक्रीट भिंती उभारणे, दरीकडील बाजूला पक्के कठडे बांधणे, दरडी रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा समावेश असलेला आराखडा करण्याच्या सूचना केल्या. भविष्यातील धोके ओळखून उपाययोजनांवर भर द्यावा, अशी सूचनाही त्यांनी केली.

मोठा खर्च येणार

भुईबावडा घाटरस्त्याला दीड वर्षापूर्वी लहानशी भेग पडली होती. त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले. त्यामुळे तीच भेग जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीने अधिकच रूंद झाली. १३० मीटर लांबीची भेग असून, संपूर्ण रस्त्याचे पुन्हा बांधणी करावी लागणार आहे. त्यासाठी मोठा निधी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT