Crime Sakal
कोल्हापूर

Bidrewadi Crime : नेम चुकला अन्‌ दुसऱ्यानेच जीव गमावला

वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाने सचिनला मोटरसायकलीच्या बॅटरीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करताना त्याने तो हल्ला चुकविल्याने मोटारसायकलवर मागे बसलेला निष्पाप ठार झाला. खुनाबद्दल दोघांना अटक

सकाळ डिजिटल टीम

नेसरी : बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) येथे जानेवारीमध्ये उत्तम भरमू नाईक यांचा सचिन भीमराव नाईक याने खून केला होता. वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्यांच्या मुलाने सचिनला मोटरसायकलीच्या बॅटरीने जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करताना त्याने तो हल्ला चुकविल्याने मोटारसायकलवर मागे बसलेला निष्पाप ठार झाला. अजित ऊर्फ गोपाळ मारूती गुरव (वय ४२, रा. बिद्रेवाडी) असे मृताचे नाव आहे. दुपारी मंगळवारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी आकाश उत्तम नाईक (वय ३०, बिद्रेवाडी) व लखन परशराम नाईक (वय २८, रा. वाटंगी, ता. आजरा) यांना पोलिसांनी अटक केली आहे. घटनेची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक रामदास इंगवले यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या खुनाचे पडसाद इतरत्र उमटू नयेत, याची खबरदारी घेत नेसरी पोलिसांना आरोपीच्या अटकेसाठी तत्काळ शोधमोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या. नेसरीचे सहायक पोलिस निरीक्षक आबा गाढवे, उपनिरीक्षक रजपूत व कर्मचाऱ्यांनी अवघ्या दोन तासांतच आरोपींना अटक केली.

या घटनेची माहिती अशी, सचिन व उत्तम नाईक हे शेजारी आहेत. माझ्या पत्नीकडे का बघितलेस, या कारणावरून सचिन याने उत्तमला शिवीगाळ करून डोक्यात लाकडी दांडक्याने जोरात मारहाण केली. या घटनेची नोंद नेसरी पोलिसांत ७ जानेवारी २०२४ रोजी झाली आहे. गंभीर जखमी उत्तमवर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर सचिनविरुद्ध खुनाचे कलम लावण्यात आले. याप्रकरणी सचिनला पोलिसांनी अटक केली. दीड महिन्यांपूर्वी त्याला जामिनावर सोडले होते. तेव्हापासून तो गावी आहे.

दरम्यान, सचिनने वडिलांचा खून केल्याचा राग मुलगा आकाशला होता. त्यातच सचिन जामिनावर गावी आल्याने तो त्याच्या टेहळणीवरच होता. ‘खून का बदला खून’ करण्याचाच त्याने चंग बांधला होता.

आज दुपारी सचिन हा दुचाकीवर अजित गुरवला बसवून घेऊन गावाकडे येत होता. ही माहिती कळताच आकाश हा लखन याला मोटारसायकलवर घेऊन त्याच्या मागावर गेला. नेसरी-हेब्बाळ जलद्याळ रोडवरील बिद्रेवाडी फाट्यावर समोरून सचिन येताच आकाशने आपल्या हातातील मोटारसायकलची बॅटरी त्याच्या दिशेने फेकली.

तितक्यात सचिन खाली वाकल्याने मागे बसलेल्या गुरव याच्या डोक्याला ही बॅटरी जोरात लागली. त्यात तो कोसळला. बॅटरी जोराने लागल्याने गुरवच्या डोक्याची कवटी फुटली. त्याला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केल; परंतु तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद नेसरी पोलिसांत रात्री उशिरापर्यंत करण्याचे काम सुरू होते.

‘खून का बदला खून’चा प्रयत्न...

वडील उत्तमच्या खुनानंतर मुलगा आकाशने सचिनला संपविण्याचाच चंग बांधला होता. सचिन जामिनावर गावी आल्याने तो त्याच्या टेहळणीवरच होता. त्याच रागातून त्याने आज हे कृत्य केले. 'खून का बदला खून' अशा त्याच्या कृत्यात ‘चोर सोडून संन्यासाला शिक्षा'' झाल्याचा प्रकार घडला. या घटनेमुळे नेसरी पंचक्रोशीत खळबळ उडाली. या घटनेतील मृत गुरव हा शेती करत होता. तो दोन ट्रॅक्टरद्वारे कारखान्याला ऊस वाहतुकीचाही व्यवसाय करतो. त्याच्या मागे पत्नी, मुलगा, मुलगी, आई, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने नेसरी पंचक्रोशी हादरली असून, गुरव याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. घटनेतील संशयित आकाश हा कामानिमित्त बाहेर असतो. तसेच शेतीही करतो.

#ElectionWithSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT