Bidri Factory Election Hasan Mushrif and Chandrakant Patil  esakal
कोल्हापूर

Bidri Election : जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी थेट मंत्रीच मैदानात; मुश्रीफ-चंद्रकांतदादांनी आखली रणनीती, कोणाचा होणार पराभव?

सध्या ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने साडेतीन तालुक्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

निवास चौगले

गेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हेही विरोधकांसोबत आहेत.

कोल्हापूर : बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा-वेदगंगा साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Dudhganga-Vedganga Sugar Factory Election) स्वतःच्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या पराभवासाठी त्यांच्याच पक्षाचे मंत्री मैदानात उतरले आहेत. पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्याच जिल्हाध्यक्षांच्या विरोधात घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली आहे.

सहकार क्षेत्रातील निवडणुका राजकीय पक्षांच्या पातळीवर किंवा चिन्हावर होत नाहीत, असा दावा केला जात असला तरी पक्षाचे अधिकृत जिल्हाध्यक्षच एखाद्या सहकारी संस्थांच्या रिंगणात उमेदवार असतील तर त्याला काय म्हणावे, असाही प्रश्‍न निर्माण होतो.

जिल्ह्यात सध्या ‘बिद्री’ कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्ताने साडेतीन तालुक्यांतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्तारूढ माजी आमदार के. पी. पाटील यांच्याविरुद्ध त्यांचे पारंपरिक विरोधक आमदार प्रकाश आबिटकर यांच्यापुरताच मर्यादित राहिलेला हा वाद आता राष्ट्रवादीचे दोन्ही गट, काँग्रेस आणि भाजपमधील फुटिरांपर्यंत येऊन पोहचला आहे.

‘बिद्री’च्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार के. पी. पाटील, काँग्रेसचे माजी मंत्री सतेज पाटील हे सत्तारूढ गटाचे नेतृत्व करतात. त्यांच्या पॅनेलमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई उमेदवार आहेत. या आघाडीच्या विरोधात मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, शिंदे गटाचे खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखालील पॅनेल आहे.

या पॅनेलमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील उमेदवार आहेत. त्यातून मुश्रीफ हे ए. वाय. यांच्या, तर मंत्री पाटील हे देसाई यांच्याच पराभवासाठी मैदानात उतरल्याचे चित्र आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सत्तारूढ आघाडीचे नेते माजी आमदार के. पी. पाटील यांना साथ दिली होती. त्यावेळी विठ्ठलराव खोराटे यांच्यासह तीन संचालक होते.

आता तेच मंत्री पाटील सत्तारूढ गटावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. दुसरीकडे गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ ए. वाय. सत्तारूढ गटासोबत होते. त्यांनी उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांच्याकडूनही सत्तारूढ गटावर आरोप होत आहेत. हा विरोधाभास चर्चेचा विषय ठरला आहे.

राजकीय समीकरणे बदलली

‘भोगावती’च्या निवडणुकीत काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील व त्यांचे कट्टर विरोधक शेकापचे माजी आमदार संतपराव पवार-पाटील हे एकत्र आले. त्याचप्रमाणे ‘बिद्री’तही सत्तारूढ गटाचे संचालक ए. वाय. पाटील यांनी विरोधी आघाडीला साथ दिली आहे. गेल्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत असलेले भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हेही विरोधकांसोबत आहेत. परिणामी या दोन्ही निवडणुकांमुळे त्या त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. त्याचे पडसाद लोकसभा, विधानसभेसह जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीतही उमटणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT