Bidri Sugar Factory esakal
कोल्हापूर

Bidri Sugar Factory : 'बिद्री' कारखाना कामगार पतसंस्थेत सत्तांतर; महालक्ष्मी विकास आघाडीच्‍या सर्व जागांवर विजय, दोन जागा बिनविरोध

सकाळ डिजिटल टीम

विरोधी परिवर्तन पॅनेलने सरासरी १५० मतांची आघाडी घेत ११ पैकी ११ जागा जिंकल्या. विजयी आघाडीचे नेतृत्व आर. वाय. पाटील, शिवाजी केसरकर, संजय मोरबाळे, व्ही. डी. व्हरकट, राजेंद्र पाटील यांनी केले.

बिद्री : बिद्री साखर कारखाना (Bidri Sugar Factory) कार्यक्षेत्र असलेल्या येथील मौनी महाराज साखर कामगार पतसंस्थेच्या झालेल्या निवडणुकीत विरोधी महालक्ष्मी विकास आघाडीने (Mahalakshmi Vikas Aghadi) सत्ताधारी महाविकास लै भारी विकास आघाडीचा पराभव करत सत्तांतर घडवले. महालक्ष्मी आघाडीच्या दोन जागा आधीच बिनविरोध झाल्याने काल ११ जागांसाठी मतदान व त्यानंतर लगेचच मतमोजणी झाली.

निकालानंतर विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सुनील जांबोटकर यांनी काम पाहिले. निवडणुकीत १३ जागांसाठी दोन आघाड्या होत्या. सत्ताधारी आघाडीला महिला उमेदवार न मिळाल्याने विरोधी आघाडीतील लक्ष्मी सुरेश तामोत व वंदना सुधीर बेलेकर बिनविरोध निवडून आल्या.

त्यामुळे उर्वरीत ११ जागांसाठी संस्थेच्या सभागृहात काल सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान झाले. राधानगरी, भुदरगड, कागल व करवीर तालुक्यांतील ४३६ पैकी ४३४ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी चारनंतर मतमोजणी झाली. यामध्ये ४३४ पैकी ४११ वैध, तर २३ मते अवैध ठरली. त्यामध्ये विरोधी परिवर्तन पॅनेलने सरासरी १५० मतांची आघाडी घेत ११ पैकी ११ जागा जिंकल्या. विजयी आघाडीचे नेतृत्व आर. वाय. पाटील, शिवाजी केसरकर, संजय मोरबाळे, व्ही. डी. व्हरकट, राजेंद्र पाटील यांनी केले.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते

किशोर बापूराव पाटील (३३०), संजय राजाराम जरग (३०३), शरद आनंदराव पाटील (२९५), सदाशिव मारुती पाटील (२९४), आनंदराव ज्ञानदेव देसाई (२८७) , विजय शंकर गुजर (३२७), तानाजी पांडुरंग शिंदे (२५८), विजय आनंदा वारके (२७७) , प्रसाद बाजीराव गोधडे (३०७) , तानाजी बाबूराव कांबळे (३०४), मधुकर शंकर लोहार (३१६).

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast: नवीन रक्तगटाचा शोध ते येत्या पंधरा दिवसात आचार संहिता लागणार

Maratha Reservation : आता वेळ वाढवून देणार नाही; मनोज जरांगे पाटील

Bigg Boss Marathi: सूरज चव्हाण शेवटच्या पाचमध्ये असेल का? 'कलर्स'चे प्रमुख केदार शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

Vaman Mhatre यांच्या अडचणी वाढणार! FIR व्हायरल केल्याचा आरोप; पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची पीडित मुलीच्या आईची मागणी

AFG vs SA 1st ODI : अफगाणिस्तानने इतिहास घडवला, दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिला

SCROLL FOR NEXT