'राधानगरी विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षे ‘हात’ या चिन्हावर उमेदवार लढलेले नाहीत. यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना संधी द्या. आमची ताकद दाखवून देऊ’
गारगोटी : ‘आजपर्यंत शांततेत झालेली मराठा आरक्षणाची (Maratha Reservation) अनेक आंदोलने दडपण्याचा प्रयत्न कोणी केला हे जनतेने तपासावे. राज्य शासनाकडे जर ताकद व हिंमत असेल तर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी तत्काळ वटहुकूम काढावा’, असे आव्हान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी दिले.
कूर येथे भुदरगड तालुक्यातील जनसंवाद पदयात्रेनिमित्त आयोजित कॉंग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना केले. माजी आमदार दिनकरराव जाधव यावेळी प्रमुख उपस्थित होते. गारगोटी ते कूर दरम्यान झालेल्या जनसंवाद पदयात्रेस उस्फूर्त प्रतिसाद लाभला. चौकाचौकात सर्वांनी स्वागत झाले. महिलांनी औक्षण केले. यावेळी आमदार पाटील यांनी नागरिक, युवक, पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
आमदार पाटील म्हणाले, ‘आज देशातील वातावरण समाधानकारक नाही. लोकाभिमुख सरकार देशात आणि राज्यात नाही. समाजातला कुठलाही घटक आज खूष नाही. यामुळे आता कुठल्याही परिस्थितीत भाजपला सत्तेत येऊ द्यायचे नाही. जनसंवाद यात्रेत भाजपविरोधात जनसामान्यांच्या मनात असलेला राग दिसत आहे. तर काँग्रेसबद्दल लोकांच्या मनात असलेले प्रेम प्रकट होत आहे.
जिल्ह्यात काँग्रेसचे संघटन बळकट करण्यासाठी जनसंवाद यात्रा महत्त्वाची ठरेल.’ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जीवन पाटील म्हणाले, ‘जनसंवाद पदयात्रेमुळे कॉंग्रेस कार्यकर्त्यांत मोठा झंझावात निर्माण झाला आहे. जिल्ह्यात कॉंग्रेसची ताकद वाढत असून राजकीय बदल अटळ आहे.’
यावेळी माजी उपसभापती सत्यजित जाधव, सचिन घोरपडे यांनी मनोगत व्यक्त केले. तालुकाध्यक्ष शामराव देसाई यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रकाश देसाई, आर. व्ही. देसाई, संजयसिंह सरदेसाई, एस. एम. पाटील, पी. डी. पाटील, शिवराज देसाई, सुधीर वर्णे, मोहन शिंदे, दिनकरराव कांबळे, भुजंगराव मगदूम, प्रताप वारके, शुभांगी जाधव, अनुराधा चव्हाण आदी उपस्थित होते. राजू काझी यांनी आभार मानले.
‘राधानगरी विधानसभा मतदारसंघात अनेक वर्षे ‘हात’ या चिन्हावर उमेदवार लढलेले नाहीत. यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेस उमेदवारांना संधी द्या. आमची ताकद दाखवून देऊ’, असे उपसभापती सत्यजित जाधव, सचिन घोरपडे यांनी सांगितले.
प्रा. सविता वर्णे यांनी केंद्र व राज्य शासनाविरोधात जनसामान्यांच्या मनात असलेला उद्रेक भारूड रुपात मांडला. या लक्षवेधी भारूडाने उपस्थितांची मने जिंकली. सर्वांनी त्यांना टाळ्या वाजवून दाद दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.