विशाळगडावर इतके गंभीर प्रकरण होऊन ज्यांना आम्ही मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे, शरद पवार यावर काहीच बोलत नाहीत. मग आम्ही आता कोणाकडे जायचे?
कोल्हापूर : राजर्षी शाहूंनी समतेचा संदेश देत सर्वांना आरक्षण दिले. ज्यात मुस्लिमही होते. त्यांच्या नगरीमध्ये विशाळगड, गजापूरमध्ये दंगल (Vishalgad Riots) घडणे दुर्दैवी आहे. याबाबत राजर्षी शाहूंच्या वंशजांवर मी काही बोलणार नाही; पण त्यांच्या कुटुंबीयांनी आता सामाजिक सलोख्यासाठी शाहूंचा समतेच्या विचार देशभरात न्यावा, त्याचा प्रसार करावा, असे आवाहन समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी पत्रकार परिषदेत केले.
विशाळगडावरील १४४ कलम हटवून तेथील जनजीवन पूर्ववत करावे. गजापूरमधील नुकसानग्रस्तांना रोज एक हजार रुपयांप्रमाणे भरपाई द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. गजापूरला भेट दिल्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, ‘पोलिसांसमोर (Kolhapur Police) विशाळगड, गजापूरमध्ये प्रकार घडला. ती एकप्रकारे दंगलच आहे. त्यावेळी सरकार झोपले होते काय? या प्रकरणामुळे संविधानाचे धिंडवडे निघाले आहेत. या प्रकरणी पोलिस प्रशासनाने दिलेले स्पष्टीकरण चुकीचे आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांना त्वरित निलंबित करावे, ज्यांनी तोडफोड केली त्यांच्यावर दहशतवादी कृत्याचे कलम लावून कारवाई करावी.’
विशाळगडावरील १९९९ पूर्वीची घरे कायदेशीर आहेत. रितसर पद्धतीने शासनाने अतिक्रमण काढावे. त्यासाठी काहीजणांनी तोडफोड करणे योग्य नाही. चूक करणाऱ्यावर कडक कारवाई करा. मात्र, त्यांचे कुटुंबीय, समाजाला दोषी ठरवू नका. बारा तारखेला संभाजी भिडे यांची सभा होणार असून त्यांना सरकारने रोखण्याची मागणी आझमी यांनी केली. पक्षाचे प्रधान महासचिव परवेझ सिद्दीकी, महासचिव शिवाजी परुळेकर, अनिस अहमद, शहराध्यक्ष मधुकर पाटील उपस्थित होते.
हसन मुश्रीफ या प्रकरणी मजबुरीने बोलत आहेत
राज ठाकरे यांनी द्वेषाचे नव्हे विकासाचे राजकारण करावे
कॉंग्रेस-राष्ट्रवादीने मुस्लिम समाजाला आरक्षण द्यावे
महापुरुष, धार्मिकस्थळाबाबत चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचे गुन्हे दाखल करावेत
विशाळगडावर इतके गंभीर प्रकरण होऊन ज्यांना आम्ही मुस्लिम समाजाने मते दिली ते उद्धव ठाकरे, शरद पवार यावर काहीच बोलत नाहीत. मग आम्ही आता कोणाकडे जायचे. आम्हाला न्याय पाहिजे. सध्याचे सरकार द्वेष पसरविण्याचे काम करत आहे. काही लोक देशाला बर्बादीकडे घेऊन जात आहेत. ते रोखण्यासाठी यापुढील निवडणुकीत इंडिया आघाडीने संघटितपणे लढणे आवश्यक असल्याचे आझमी यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.