कोल्हापूर : देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे, असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. कोल्हापुरातील जाहीर सभेत बोलताना राऊत यांनी हे आरोप केले आहेत. (BJP is most corrupt party in country says Sanjay Raut)
राऊत म्हणाले, "देशातील सर्वात भ्रष्ट पक्ष कुठला असेल तर तो भारतीय जनता पक्ष आहे. भाजपच्या तिजोरीत साडेपाच हजार कोटी रुपये आहेत. भाजप हा देशातील सर्वात श्रीमंत पक्ष आहे त्यांच्याकडे हे पैसे आले कुठून? काँग्रेस असेल तर इतरही काही जुने पक्ष देशात आहेत त्यांच्याकडे दोनशे-पाचशे कोटी रुपये असतील. पण हजारो कोटी रुपये तुमच्या तिजोरीमध्ये आहेत हे पैसे काही सजह आलेत ते तुम्हाला उद्योगपती देतात, व्यापारी देतात. तुम्ही त्या उद्योगपतींची काम करता त्यामुळं ते तुम्हाला पैसा देतात. तुम्ही आम्हाला काय सांगता भ्रष्टाचाराच्या गोष्टी"
ज्या युद्धनौकेनं सन १९७१ मधील भारत-पाक युद्ध जिंकून दिलं. ही युद्धनौका निवृत्त व्हायची वेळ आली तेव्हा ती आपण वाचवायला पाहिजे असं सर्वांनी ठरवलं. तिचं जतन केलं पाहिजे स्मारक केलं पाहिजे. केंद्राकडं पैसे नसतील तर आपण पैसे गोळा केले पाहिजे. त्यावेळी सोमय्या म्हणाले की, सरकारकडं पैसे नसतील तर मी ३०० कोटी रुपये गोळा करतो. हे पैसे गोळा करुन मी ते राजभवनात जमा करीन. त्यानुसार, त्यांनी कोट्यवधी रुपये गोळा केले. पण विक्रांत भंगारात गेल्यामुळं हे लक्षात आलं की, सोमय्यांनी गोळा केलेल पैसे गेले कुठे? त्यामुळं मी राजभवनाला पत्र लिहून विचारलं की हे पैसे तुम्हाला मिळाले का? राज्यपाल त्यांचेच कार्यकर्ते त्यांनाही कळलं नाही की मी कुठल्या कागदावर सही करतोय. त्यांनी कळवलं की, असे कोणतेही पैसे आमच्याकडे आलेले नाहीत.
एक हजार कोटींचा मानहानीचा दावा केला तरी तुरुंगात पाठवणार
भाजपनं देशाच्या संरक्षणातील पैसे खाल्ले, टॉयलेट घोटाळाही केला. हे आरोप केल्यामुळं माझ्यावर सोमय्यांनी १०० कोटींचा दावा दाखल केला. पण १००० कोटींचा दावा केला तरी तुम्हाला तुरुंगात पाठवणार, असा थेट इशाराच यावेळी संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.