'लाचारी व एजंटगिरी मोडून काढण्यासाठीच ‘समरजितसिंह आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे.'
मुरगूड : ‘त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या चुकाच त्यांना सत्तेवरून खाली खेचतील, तर आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली प्रामाणिक कामे आगामी निवडणुकीत सुराज्य आणतील,’ असा विश्वास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे (Samarjeet Ghatge) यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. येथे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७५ व्या जयंतीनिमित्त राजे फौंडेशन व राजमाता जिजाऊ समितीतर्फे आयोजित ‘समरजितसिंह आपल्या दारी’ अभियानावेळी ते बोलत होते. यावेळी अनंत फर्नांडिस, दत्तामामा खराडे, विलास गुरव, बजरंग सोनुले आदी प्रमुख उपस्थित होते. यावेळी रणजितसिंह पाटील यांचेही भाषण झाले.
शासनाच्या योजनांच्या लाभासाठी कागलमध्ये नागरिकांना वर्षांनुवर्षे मंत्र्यांच्या दारात चकरा माराव्या लागतात. त्यांच्या राजकीय सभा समारंभांना उपस्थित राहण्यासाठी लाभार्थ्यांवर सक्ती करत त्यांना वेठीस धरले जाते. ही लाचारी व एजंटगिरी मोडून काढण्यासाठीच ‘समरजितसिंह आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला आहे,’ असे घाटगे म्हणाले.
या कार्यक्रमात घाटगे यांनी लाभार्थी महिलांना बदल हवा काय? असे विचारले. त्यावर त्या ‘हो’ म्हणाल्या. मग घाटगे यांनी ‘बदल हवा, तर आमदार नवा’ हे वाक्य बोलून दाखवले. आणि हे वाक्य एका कार्यकर्त्यांने आपल्याला रस्त्यात सांगितले असून ते मला खूपच आवडल्याचेही सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.