Congress leader Rahul Gandhi esakal
कोल्हापूर

'ते' वक्तव्य भोवलं! काळे झेंडे दाखवत राहुल गांधींच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा तीव्र विरोध, पोलिस-कार्यकर्त्यांत झटापट

Congress leader Rahul Gandhi visit to Kolhapur : काही दिवसांपूर्वी आरक्षणासंदर्भात चुकीचं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

भाजप कार्यालयातच कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेरलं असून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुरु आहे.

कोल्हापूर : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्या कोल्हापूर दौऱ्याला भाजपचा (BJP) तीव्र विरोध होताना दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी आरक्षणासंदर्भात चुकीचं वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधींना भाजपकडून काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. गांधी येण्यापूर्वीच भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांकडून घेराव सुरु आहे.

भाजप कार्यालयातच कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेरलं असून भाजपचे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये झटापट सुरु आहे. भाजपचे कार्यकर्ते गेट तोडून आंदोलन करण्यासाठी मुख्य रस्त्याकडे जाताना दिसत आहेत. मात्र, पोलिसांनी वाटेतच अडवल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यावर ठिय्या मांडला आहे.

Congress leader Rahul Gandhi

भाजप कार्यकर्त्यांकडून राहुल गांधी यांच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली जात आहे. सध्या राहुल गांधी हे उचगाव येथील कार्यकर्त्यांच्या घरी आहेत. कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी उचगावमधील काँग्रेस कार्यकर्त्याची भेट घेतलीये. त्यांनी अचानक भेट दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह असून पोलिसांची मात्र तारांबळ उडाली आहे.

राहुल गांधी का आलेत कोल्हापूरला?

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज कोल्हापूर शहराच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम होणार आहेत. गांधी कालच दिल्लीतून कोल्हापुरात येणार होते. मात्र, विमानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे त्यांना दौरा रद्द करावा लागला होता. आज कसबा बावडा येथे उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे त्यांच्या हस्ते अनावरण होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मानखुर्द शिवाजीनगर इथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक पराभूत

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मागाठाणे विधानसभा मतदार संघातून प्रकाश सुर्वेंची हॅट्रिक

Malshiras Assembly Election 2024 Result Live: उत्तम जानकरांचा विजय, राम सातपुतेंना मतदारांचा गुलीगत धोका!

MNS Failed In Assembly Elections: मनसेच्या पराभवाचं 'राज' काय?, अमित ठाकरेंसह राजू पाटीलही पराभूत, मनसेचा धुव्वा

IND vs AUS, 1st Test: यशस्वी जैस्वाल शतकाच्या उंबरठ्यावर, केएल राहुलचीही फिफ्टी! भारताकडे भक्कम आघाडी

SCROLL FOR NEXT