कोल्हापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी खासदार धनंजय महाडिक हे एकत्रित येऊ नयेत, म्हणून काही मंडळी प्रयत्न करतात. कारण दोन गट असल्याशिवाय आमचं घर चालणार, अशा स्वभावाची मंडळीच पाटील आणि महाडिक यांना एकत्रीत होऊ देत नाही, असे खळबळजनक वक्तव्य आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले. बहिरेवाडी (ता. आजरा) येथील शहीद जवान ऋषीकेश जोंधळे यांच्या घराच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. सुहास चौगुले यांनी स्वागत केले. भाजप तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार यानी प्रास्तविक केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘पालकमंत्री पाटील आणि महाडिक हे किती जवळचे मित्र आहेत, त्याचा मी साक्षीदार आहे. संपूर्ण जिल्ह्यानेही यापूर्वी ते अनुभवले आहे. मात्र, आता त्यांनी एकत्र यायचे म्हटले तर दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी सुरू होतील. युद्ध संपले तर शस्त्र कोण खरेदी करणार, तसेच या दोघांतील वाद मिटला तर आपले घर कसे चालणार, असा अनेकांसमोर प्रश्न आहे. या दोघातील वाद मिटू नये यासाठी एक यंत्रणा कार्यरत आहे.’’
दरम्यान, ऋषिकेश १३ नोव्हेंबरला पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले होते. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जोंधळे परिवाराची भेट घेऊवून सांत्वनप्रसंगी वर्षात ऋषिकेश यांच्या स्वप्नातील घर पूर्ण करण्याचे वचन दिले होते. नऊ महिन्यात घर पूर्ण केले. या घराचा दुसरा मजला पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे पूर्ण करणार आहेत.
कार्यक्रमास भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा संघटक नाथाजी पाटील, जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, सरपंच अनिल चव्हाण, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शिवाजी पोवार, तालुका भाजप सरचिटणीस अतीषकुमार देसाई, श्रीपती यादव, शैलेश मुळीक, संतोष बेलवाडे, प्रदीप लोकरे, भास्कर भाईगडे, प्रवीण लोकरे, संजय धुरे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.