Black money is being white by bachat gat sakal
कोल्हापूर

काळा पैसा पांढरा होतोय बचत गटांद्वारे...

कर्ज न मिळालेल्या महिला पोलिसांत; मुख्य सूत्रधार देशाच्या आर्थिक राजधानीत

अभिजित कुलकर्णी

नागाव : जिल्ह्यातील गावोगावी पसरलेल्या महिला बचत गटांचा आधार घेत काळा पैसा आता पांढरा केला जात आहे. मासिक दोन टक्के व्याज दराने एकाला दोन ते पाच लाखांपर्यंतचे कर्ज बचत गटाच्या माध्यमातून दिले जाते. शेकडो महिलांनी यासाठी केवायसी कागदपत्रे, कर्ज मागणी अर्ज, मुद्रांक व लाखाला शंभर रुपयांप्रमाणे शुल्क जमा केले आहे. विशेष म्हणजे अनेकांना कर्ज मिळाले आहे. उर्वरित महिला कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

काहींनी कर्ज मिळण्याची शक्यता नसल्याने तक्रारीचा सूर ओढत पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. ना बँक, ना पतसंस्था, ना फायनान्स कंपनी तरीही एवढ्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम कर्ज स्वरूपात कशी मिळते, म्हणून पोलिस प्रशासनही बुचकळ्यात पडले आहे. टोप परिसरातील एका फार्म हाऊसवर या व्यवहारांची देवाण-घेवाण चालते. थोडक्यात हे फार्म हाऊस जिल्ह्याचे मुख्य कार्यालय आहे. सर्व सोपस्कार पूर्ण झाला की, संबंधित कर्जदारास थेट बँक खात्यात कर्जाची मंजूर रक्कम मिळते आणि कर्जाचा हप्ताही बँक खात्यातूनच उचलला जातो; पण कोणतीही नोंदणीकृत वित्तीय संस्था यामध्ये काम करताना दिसत नाही. त्यामुळे बेकायदेशीर मार्गाने मिळालेला काळा पैसा यात वापरला जात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महिला बचत गटाचा आधार मिळत असल्याने काळा पैसा पांढरा होत आहे.

जुजबी कारवाई

शुक्रवारी (ता. २८) शिरोली एमआयडीसी पोलिसांनी संबंधित फार्म हाऊसवर कारवाई केली; पण यामध्ये आठ महिलांविरुद्ध कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंद करून कारवाई केली. एकूणच व्यवहार आक्षेपार्ह असताना केलेल्या जुजबी कारवाईमुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

मुख्य सूत्रधार कोण

बेकायदेशीर मार्गाने मिळविलेला पैसा महिला बचत गटांच्या माध्यमातून गावोगावी कर्ज स्वरूपात दिला जातोय, यात शंकाच नाही. मात्र यातील मुख्य सूत्रधार कोण याचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT