या कारवाईने हातकणंगले येथील सर्वच सरकारी कार्यालयामध्ये खळबळ उडाली आहे.
हातकणंगले : कौटुंबिक न्यायालयातील केसच्या सुनावणीतील अटक वॉरंटमध्ये अटक न करता मदत करणेसाठी दोन हजाराची लाच स्विकारताना हातकणंगले पोलिस ठाणेच्या पोलिसाला रंगेहात पकडण्यात आले. नामदेव औंदुंबर कचरे (वय वर्ष - ३६ , रा. राजपल्लु मंगल कार्यालयाजवळ, उचगांव, ता. करवीर) असे पोलीस नाईकाचे नांव असुन ही कारवाई कोल्हापुर लाचलुचपत विभागाकडुन करणेत आली आहे. या कारवाईने हातकणंगले येथील सर्वच सरकारी कार्यालयामध्ये खळबळ उडाली आहे. (bribe case in hatkanangale kolhapur)
याबाबत आधिक माहिती अशी की, तक्रारदार याचे धारवाड येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये वाद सुरु आहे. न्यायालयाने तक्रारदार यांचे विरुद्ध अटक वॉरंट काढले होते. अटक वॉरंटमध्ये अटक न करता मत करणेसाठी पोलिस नाईक नामदेव कचरे यांनी तीन हजार रुपये लाचेची मागणी केली होती. पण तडजोडी दरम्यान दोन हजार रुपये देणेचे ठरले .
तक्रारदार यांनी २९ ऑगष्ट रोजी कोल्हापुर येथील लाचलुचपत विभागाकडे लेखी तक्रार केली. आज दुपारच्या दरम्यान लाचलुचपत विभागाने हातकणंगले पोलिस ठाणेचे बाजुस असलेल्या रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला तक्रारदार यांचेकडून नामदेव कचरे या पोलिस नाईक यास दोन हजार रुपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडले.
दरम्यान, ही कारवाई पोलिस उपआयुक्त राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, पोलिस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक नितीन कुंभार, पोलिस उपनिरिक्षक संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. शरद पोरे, विकास माने, पो. ना. सुनिल घोसाळकर , नवनाथ कदम, पो.कॉ. मयुर देसाई, रुपेश माने, विष्णु गुरव यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.