कोल्हापूर

Good News : इचलकरंजी पालिकेला दीड कोटींचा निधी

डिजिटल शाळांसाठी 1 कोटी; मसोबा देवस्थानसाठी 50 लाख

सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी : खासदार धैर्यशील माने (dhaiयांच्या प्रयत्नांतून राज्य शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण विकास योजने अंतर्गत इचलकरंजी पालिकेला दीड कोटीचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये दिल्लीच्या धर्तीवर पालिकेच्या प्राथमिक शाळा डिजिटल करण्यासाठी एक कोटी रुपये तर शहापूर मसोबा देवस्थान परिसर सुशोभिकरणासाठी 50 लाख रुपये निधीचा समावेश आहे. याबाबतची माहिती नगराध्यक्षा अलका स्वामी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, शिक्षण सभापती मनोज साळुंखे, प्रशासन अधिकारी नम्रता गुरसाळे, नगरसेवक रविंद्र माने, मनोज हिंगमीरे, मदन झोरे, युवराज माळी, किसन शिंदे, माजी नगरसेवक महादेव गौड, भाऊसाहेब आवळे, सयाजी चव्हाण, नगरसेविका सारीका पाटील, संध्या बनसोडे, नगर अभियंता संजय बागडे आदी उपस्थीत होते.

खासदार माने यांनी पालिकेसमोर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशव्दार उद्घाटनप्रसंगी पालिकेच्या शाळा दिल्लीच्या धर्तीवर डिजिटल करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली असून पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. यातून पालिकेच्या सात शाळा पहिल्या टप्प्यात डिजीटल केल्या जाणार आहेत. याव्दारे विद्यार्थ्यांना विविध भौतिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार असून त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीस लागण्यास मदत होणार आहे.

शहापूर मसोबा देवस्थान परिसर सुशोभिकरणाचा 5 कोटी 38 लाखाचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाली असून टोकण म्हणून 50 लाखांचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे. या प्रस्तावात भक्त निवास उभारणी, स्वागत कमान, मुलांसाठी बालोद्यान, जलकुंभ आदी सुविधांचा समावेश आहे. या दोन्ही कामांची पालिका प्रशासनाकडून तांत्रिक मंजुरी घेतली जाणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांकडून प्रशासकीय मंजुरी मिळणार आहे. ही प्रक्रिया पार पडल्यानंतर या दोन्ही कामांची ई-निविदा काढली जणार आहे.

पालिकेवर भार नाही

दोन्ही कामांसाठी राज्य शासनाने 100 टक्के निधी मंजूर केला आहे. यामध्ये पालिकेचा यामध्ये हिस्सा असणार नाही. त्यामुळे सद्या आर्थिक अडचणीत असलेल्या पालिकेला एक प्रकारे मोठा दिलासाच मिळाला आहे. तर 100 टक्के निधीमुळे दोन्ही विकास कामांना गती मिळण्यास मोठी मदत होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT