burden of sewage Gram Panchayat and suburbs Municipal Corporation sakal
कोल्हापूर

कोल्हापूर : ग्रामपंचायती आणि उपनगरातील सांडपाण्याचा भार मनपावर

शहराजवळील ग्रामपंचायत, उपनगरांत प्रक्रिया प्रकल्प होण्याची गरज

ओंकार धर्माधिकारी

कोल्हापूर : शहराभोवती असणाऱ्या ग्रामपंचायती आणि उपनगरातील सांडपाणी वेगवेगळ्या नाल्यांमधून महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातच येते. त्याच्यावर येथे प्रक्रिया होते व पुढे ते नदीत सोडले जाते. मात्र, याचे कोणतेही उत्पन्न महापालिकेला मिळत नाही. तसेच या अतिरिक्त सांडपाण्याचा भार महापालिकेच्या प्रकल्पांवरच आहे. या ग्रामपंचायतींनी आपापले सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याची आवश्यकता आहे.

पंचगंगा नदीतील मासे मेल्याने जलप्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर आला. महापालिका क्षेत्रातील काही नाल्यांचे पाणी थेट नदीत जात असल्याचे निदर्शनास आले. महापालिका क्षेत्रात ९६ एम.एल.डी सांडपाणी तयार होते. त्यातील ९२ एम.एल.डी सांडपाण्यावर सध्या प्रक्रिया केली जाते. अतिरिक्त चार एमएलडी पाणी नाल्यांमधून नदीत जाते. सध्या महापालिका जेवढ्या सांडपाण्यावर प्रक्रिया करते त्यातील पाच एमएलडी पाणी शहराच्या भोवती असणाऱ्या ग्रामपंचायती, उपनगरातून येते. यातील बहुतांश ग्रामपंचायतींना प्राधिकरणाचा पाणीपुरवठा होतो. त्याचे बिलही प्राधिकरण घेते. मात्र, या पाण्यातून तयार होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया मात्र महापालिकेला करावी लागते.

महापालिका क्षेत्रात सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा अधिभार बिलातून घेतला जातो. मात्र, या ५ एम.एल.डी सांडपाण्याचा अधिभार महापालिकेला मिळत नाही. या ग्रामपंचायतींनी स्वतःचे प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे निश्चित झाले. त्यांना निधीही देण्यात येणार आहे. शिवाजी विद्यापीठ आणि के.आय.टी महाविद्यालय यासाठी तंत्रज्ञान देणार आहे. मात्र वर्ष झाले तरी अद्याप एकही प्रक्रिया प्रकल्प उभारलेला नाही. उपनगरातील लोकसंख्या वर्षागणिक वाढत आहे. त्यामुळे त्यांचे सांडपाणीही वाढत असल्याने महापालिकेवरील हा भार वाढत जाणार असून, ग्रामपंचायतींनी पुढाकार घेण्याची गरज आहे.

असे येते सांडपाणी

गाव नाला

  • मोरेवाडी - रेव्ह्यूनी कॉलनी, एस.एस.सी. बोर्ड, शास्त्रीनगरमार्गे उद्यमनगरमध्ये गोमती नाल्याला मिळतो

  • आर.के.नगर - राजेंद्रनगर, एस.एस.सी. बोर्ड, आधार हॉस्पिटलमार्गे उद्यमनगरमध्ये गोमती नाल्याला मिळतो

  • पाचगाव - जरगनगर, रामानंदनगर, यल्लमा मंदिरमार्गे गोमती नाला

  • उचगाव - येथील नाला वीटभट्टीच्या मागून नदीत मिसळतो

मोरेवाडी, पाचगाव आणि उचगाव येथील सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी सुरू असलेले सर्वेक्षणाते काम अंतिम टप्प्यात आले. लवकरच निधी मंजूर होऊन सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणीच्या कामाला सुरुवात होइल.

-प्रियदर्शनी मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT