Kagal Crime News esakal
कोल्हापूर

'मैत्री दिनी'च काळाचा घाला! पाझर तलावात बुडून उद्योजकाचा दुर्दैवी अंत; काठाजवळ दहा फुटांवर आले असतानाच दम लागून..

कागल येथील पाझर तलावावर (Kagal Lake) मित्रांसह फिरण्यास आलेल्या उद्योजकाचा बुडून मृत्यू झाला.

सकाळ डिजिटल टीम

रविवारी (ता. ४) ‘फ्रेंडशिप डे’ होता. याच दिवशी हे चारही मित्र कागलला फिरण्यासाठी एकत्र आले होते. ते असेच नेहमी फिरण्यासाठी जात.

कागल : येथील पाझर तलावावर (Kagal Lake) मित्रांसह फिरण्यास आलेल्या उद्योजकाचा बुडून मृत्यू झाला. मनोज सदाशिव मोरडे (वय ४४, रा. विराज सिटी, कागल, मूळगाव नानीबाई चिखली, ता. कागल) असे त्यांचे नाव आहे. सकाळी ११.३० च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

मनोज यांचा खताचा व्यवसाय असून, गोकुळ शिरगाव (Gokul Shirgaon) येथे त्यांचा कारखाना आहे. ते मित्रांसमवेत ‘फ्रेंडशिप डे’ (Friendship Day) साजरा करण्यासाठी एकत्र आले होते. त्‍यावेळी ही दुर्घटना घडल्‍याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

कागल येथील पाझर तलावाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या ठिकाणी कृत्रिम धबधबा करण्यात आला आहे. त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. काल रविवार असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होती. मनोज मोरडे हे आपल्या चार मित्रांसह सकाळी कागल येथील उडपी हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी जमले. त्यावेळी त्यांनी पाझर तलावावरील धबधबा पाहण्याचे ठरविले व ते सर्वजण तेथे गेले.

धबधबा पाहून सर्वजण तलावाच्या काठावर आले. यावेळी धबधब्यात भिजल्यामुळे मनोज मोरडे यांना अंघोळ करण्याची इच्छा झाली. नगरपालिकेने पोहण्यासाठी केलेल्या थांब्यावरून त्यांनी तलावात दोन-तीन वेळा उड्या मारल्या. ते पट्टीचे पोहणारे होते. ते पोहत होते, त्यावेळी सर्वजण बंधाऱ्यावर बसून धबधब्याजवळ केलेले व्हिडिओ व फोटो पाहण्यात दंग होते.

दरम्यान, मनोज बराचवेळ न दिसल्याने सर्वजण त्यांचा शोध घेऊ लागले. यावेळी एका मित्राने मनोज कारंजांच्या दिशेने पोहोत गेले आणि तिथून परत येत होते असे पाहिले होते. त्यानंतर ते दिसेनासा झाले. तलावाच्या काठाजवळ आठ दहा फुटांवर आले असताना दम लागून ते बुडाले. एक व्यक्ती बुडाल्याची घटना कळाल्याने पर्यटकांची व नागरिकांची गर्दी झाली.

यावेळी तलावावरील आपत्ती व्यवस्थापन पथकाला पाचारण करण्यात आले. त्यानंतर अशोकराव माने, शिक्षक तानाजी पाटील यांना मनोज यांना शोधण्यासाठी बोलाविण्यात आले. त्यांना अमोल आंबी, नीतेश कांबळे यांनी मदत केली. दुपारी दीडच्या सुमारास अशोकराव माने यांना मनोज यांचा मृतदेह सापडला. तो पाण्यातून काढण्यात आला व शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला.

दरम्यान, अशोकराव माने यांनी मृत मनोजच्या दोन्ही मुलांना पाझर तलावात अलीकडेच पोहायला शिकविले आहे. आज मनोजचा मृतदेह अशोकराव यांनीच शोधून पाण्यातून वर आणला. ज्या मुलांना शिकविले त्यांच्या पालकांचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याची वेळ शिक्षकांवर आली. मनोज यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. याप्रकरणी सागर देवर्षी यांनी कागल पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मैत्री दिनीच काळाचा घाला

रविवारी (ता. ४) ‘फ्रेंडशिप डे’ होता. याच दिवशी हे चारही मित्र कागलला फिरण्यासाठी एकत्र आले होते. ते असेच नेहमी फिरण्यासाठी जात. येथील पाझर तलावावरील धबधब्याचा आनंद घेऊन पोहण्यासाठी गेलेल्या मनोजवर मित्रांसमोरच मैत्री दिनीच काळाने घाला घातला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT