महाराष्ट्रातील राजकारणात मोठा गदारोळ पहायला मिळत आहे.
कोल्हापूर : महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) मोठा गदारोळ पहायला मिळत आहे. शिंदे गट-ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. कोल्हापूरतही (Kolhapur) शिंदे विरुध्द ठाकरे असाच काहीसा सामना रंगताना दिसत आहे. कोल्हापुरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आलीय. इथं शिंदे गटातील महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग करण्यात आलाय.
या विनयभंगप्रकरणी ठाकरे गटाच्या (Thackeray Group) शहर प्रमुखासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत (Ganesh Visarjan 2022) शिंदे गटाच्या स्टेजसमोर या सर्वांनी लज्जा उत्पन्न होईल, असं वक्तव्य करत डान्स केल्याचा आरोप केला गेला आहे.
याप्रकरणी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले (Ravikiran Ingawale) यांच्यासह 40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेतील फिर्यादी कोल्हापूर शहर शिवसेना या राजकीय पक्षाच्या संघटक आहेत. फिरंगाई तरुण मंडळ शिवाजीपेठ, कोल्हापूर (Firangai Tarun Mandal Shivajipeth, Kolhapur) यांची मिरवणूक आलेली असताना हा प्रकार घडला. सध्या शिवसेना पक्षात पडलेले दोन गट आणि त्यांच्यातील वाद रागात धरून हे कृत्य करण्यात आल्याचं फिर्यादीनं म्हटलंय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.