कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी (gokul kolhapur) दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) एका हॉटेलमध्ये असणारे खाते बंद (account close) करण्याचा निर्णय नवोदित संचालक नविद मुश्रीफ (navid mushrif) यांनी जाहीर केला. हा संघाच्या दृष्टीने चांगला आणि हिताचा निर्णय आहे. मात्र, यात संघाचे अधिकारी, सुपरवायझर आणि कर्मचारी ठरावदार आहेत. ज्यांच्या दूध संस्थेचा पत्ता नाही असेही ठरावदार म्हणून मतदान करतात. अशांना मतदार यादीतून कमी करण्याचे किंवा कागदोपत्री असणाऱ्या दूध संस्था कमी करण्याचे आव्हान (challenge) दोन्ही मंत्र्यांनी पेलले पाहिजे.
गोकुळची २३०० कोटींची उलाढाल. संघ सक्षम आणि चांगला चालावा, यासाठी सत्तारूढ आणि विरोधी पॅनेल प्रमुखांनी (opposite panel leader) एकमेकांविरूध्द कंबर कसली. विरोधकांनी यामध्ये बाजी मारली. आता याच संचालकांनी प्रामाणिकपणे ज्या-ज्या कागदोपत्री असलेल्या संस्थांवर कायमची फुली मारण्याची वेळ आली आहे. गाव एक आणि संस्था अनेक असे चित्र सध्या आहे.
काही गावात क्रियाशील संस्था दोन आणि कागदोपत्री संस्था ७ ते ८ आहेत. अशा संस्थांवर तीन वर्षापूर्वी गंडांतर आणले हाते. मात्र, काही कारणास्तव पुन्हा या संस्था कार्यरत असल्याचे दाखवले आहे. केवळ मतांसाठीच अशा संस्थाचा वापर होत आहे. या संस्था कमी व्हाव्यात यासाठी वारंवार मागणी होत असताना याकडे दुर्लक्ष केले जात आहे. आता अशा संस्थांनाही घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.