Chandgad Constituency Ajit Pawar esakal
कोल्हापूर

Ajit Pawar : 'माझ्या नशिबातच होतं, माझा हा रेकॉर्ड कोणी माय का लाल मोडणार नाही'; असं का म्हणाले अजितदादा?

सकाळ डिजिटल टीम

''बहुजनांच्या हितासाठी मुश्रीफ यांनी आमच्यासोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय पचनी न पडल्यानेच त्यांना पोटशूळ उठले आहे.''

गडहिंग्लज : महायुती शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण, शेतीपंपाला मोफत वीज, मोफत उच्च शिक्षण, गॅस सिलिंडर, गाय दुधाला अनुदान आदी योजना औटघटकेच्या नाहीत. त्या कायमस्वरूपी सुरू राहतील, हा माझा वादा आहे. विधानसभा निवडणुकीत आम्ही पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेत आणण्याच्यादृष्टीने काम करत आहोत. विरोधकांच्या अपप्रचारावर विश्वास न ठेवता जनतेने साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे जनसन्मान यात्रेचे स्वागत करण्यात आले. यानिमित्त आयोजित जाहीर सभेला त्यांनी संबोधित केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, आमदार राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, नविद मुश्रीफ यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, ‘चंदगड मतदारसंघातील (Chandgad Constituency) हत्ती, गवे, रानडुकरामुळे होणाऱ्या नुकसानीला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाच्या चौकटीत राहून भरपाई देण्याचा निर्णय घेऊ. गडहिंग्लज, आजरा व चंदगडच्या विकासात स्व. बाबा कुपेकर, स्व. सदाशिवराव मंडलिक व स्व. नरसिंगराव पाटील या लढवय्या नेत्यांनी योगदान दिले आहे. आता त्यात आमदार राजेश पाटील यांच्या योगदानाची भर पडली आहे. पाच वर्षांत त्यांनी माझ्याकडे पाठपुरावा करून १६०० कोटींचा विकासनिधी आणला. आमदार कसा असावा हे त्यांनी दाखवून दिले आहे.’

आमदार पाटील म्हणाले, ‘स्व. कुपेकर, स्व. नरसिंगरावांनी पाहिलेले मतदारसंघाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. १६०० कोटींचा निधी आणल्याने कांहीना आगडोंब होत आहे. त्यांना निवडणुकीतूनच जनता उत्तर देईल.’ जयसिंग चव्हाण यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांचेही भाषण झाले. अभयसिंह देसाई यांनी आभार मानले. रामाप्पा करिगार, भिकू गावडा, बाबासाहेब पाटील, सुधीर देसाई, प्राची काणेकर आदी उपस्थित होते.

Chandgad Constituency Ajit Pawar

‘माझा रेकॉर्ड मोडणार नाही’

पवार म्हणाले, ‘राज्याने मला भरभरून दिले आहे. सातवेळा जनतेने आमदारकी दिली. पाचवेळा उपमुख्यमंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली. माझ्या नशिबातच होतं, म्हणून मला पद मिळालं. परंतु, हा माझा रेकॉर्ड कोणी माय का लाल मोडणार नाही.’

‘आम्ही गोट्या खेळत नाही...’

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘स्वतः पोटाला चिमटा लावून कुटुंबातील महिला रात्रंदिवस इतरांचं भलं करण्यासाठी कष्ट करते. त्यांच्यासाठी आम्ही योजना आणली. तरीही विरोधकांनी त्याला विरोध केला. काँग्रेसने तर सत्ता आल्यास योजना बंद करण्याची घोषणा केली. ही योजना वाईट आहे का, हे आपणच सांगावे. लाडक्या बहिणींचा सन्मान करताना कोणतीच आर्थिक शिस्त मोडलेली नाही. राज्य कसं चालवायचं असते हे आम्हाला चांगले माहीत आहे. आम्ही येथे गोट्या खेळायला आलेलो नाही. आम्ही कामाची माणसं आहे. मी प्रसंगी स्पष्ट व खरं बोलेन. पण, शब्द बदलणार नाही. ’

तटकरेंची सुळेंवर नाव न घेता टीका...

खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव न घेता तटकरे म्हणाले, ‘संसदरत्नांनी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली. यूपीए सरकारच्यावेळी अण्णा हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाचे नेतृत्व अरविंद केजरीवाल यांनी केले. तेव्हा मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळावर केजरीवालांनी आक्षेप घेतले. ते आता तुमच्यासोबत बैठकीला असतात. अमित शहा देशाचे कणखर नेते आहेत. त्यांचे स्वागत व निरोप देण्यासाठी गेलेल्या मुश्रीफ यांच्यावर टीका करायचे काय कारण होते. व्यक्तीद्वेष किती असावा याला मर्यादा आहेत. बहुजनांच्या हितासाठी मुश्रीफ यांनी आमच्यासोबत सत्तेत येण्याचा निर्णय घेतला. पण, हा निर्णय पचनी न पडल्यानेच त्यांना पोटशूळ उठले आहे. म्हणूनच ते टीका करताहेत.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lakshman Hake: लक्ष्मण हाकेंनी मद्यप्राशन केल्याचा आरोप! पुण्यात हाके-मराठा आंदोलकांमध्ये वाद

Western Railway Block: मंगळवारीही पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना तारेवरची कसरत होणार, अनेक गाड्या रद्द

Dalit Student IIT Admission: सरन्यायाधिशांनी वापरला विशेषाधिकार अन् गरीब दलित विद्यार्थ्याला मिळाला IITत प्रवेश

Chhatrapati Sambhajinagar: फुलंब्रीच्या जागेसाठी ठाकरे गट महाविकास आघाडीतच भिडणार.!

IND vs BAN: कानपूर कसोटी सुरू असतानाच टीम इंडियातून ३ खेळाडू झाले बाहेर, BCCI ने कारणही केलं स्पष्ट

SCROLL FOR NEXT