Sambhaji Raje Chhatrapati  sakal
कोल्हापूर

Chhatrapati Sambhajiraje: कोल्हापूरची जागा स्वराज्यला देणार, काँग्रेसने शब्द दिला होता पण... छत्रपती संभाजीराजेंचा मोठा गौप्यस्फोट

Vrushal Karmarkar

मनोज जरांगे यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. त्यांनी लवकर निर्णय घ्यावा, आमच्या बरोबर जर आले तर आनंदच आहे. मनोज जरांगे यांनी निवडणूक लढवायला पाहिजे. २० तारखेला त्यांनी जी बैठक बोलावली आहे त्यात ते भूमिका जाहीर करतील, असं वक्तव्य छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. ते आज पत्रकारांशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

यावेळी बोलताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, काँग्रेस हाय कमांडने मला शब्द दिला होता. शाहू महाराज यांची उमेदवारी विषय पुढे आला. जेव्हा त्यांचा विषय येतो तेव्हा माझ्या विषयांना पूर्णविराम लागतो. मी कुठल्या ही सत्कार, सन्मानाला गेलो नाही. सतेज पाटील किंवा काँग्रेसने मला का नाही बोलावले? मी पण तेव्हा राबलो ना. मला हाय कमांडच्या खाली आम्हाला काम करायला आवडत नाही. आता जे घडलं तो भूतकाळ आहे, असं म्हणत त्यांनी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली आहे.

स्वराज्य ही चळवळ शाहू महाराज खासदार व्हायच्या आधीपासून सुरू आहे. लोकसभा निवडणुकीवेळी काँग्रेस आणि स्वराज्य युती करणार होतं. कोल्हापूरची जागा स्वराज्याला देणार, असा शब्द मला काँग्रेसच्या हाय कमांडनी दिला होता, असा छत्रपती संभाजीराजेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते पुढे म्हणाले की, छत्रपती शाहू महाराजांची उमेदवारी पुढे आल्यानंतर माझ्या समोरचे सगळे पर्याय थांबले. त्यामुळे शाहू महाराज उभे राहिले असताना एक मुलगा म्हणून माझी जी जबाबदारी होती ती मी पूर्णपणे पार पाडली. शाहू महाराज निवडून आले तेव्हां सत्कार सोहळ्यात मला का बोलावले नाही? शाहू महाराजांना निवडूण आणण्यात मी पण राबलो आहे, अशी खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS W vs SA W: गतविजेता ऑस्ट्रेलिया 15 सामन्यानंतर मोक्याच्या क्षणी हरला; दक्षिण आफ्रिकेने इतिहास घडवला

Hamas Chief Death: हमास प्रमुख याह्या सिनवर इस्राईल लष्कराच्या हल्ल्यात ठार; पंतप्रधान नेत्यानाहूंची घोषणा

Baba Siddiqui Case: मुंबई पोलीस अॅक्शन मोडमध्ये, आरोपी शिवकुमार गौतम आणि जीशान अख्तरच्या विरोधात लुक आउट सर्कुलर जारी

Navi Mumbai Assembly Elections: नवी मुंबईत महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; शरद पवार गट नवा डाव खेळणार!

IND vs NZ: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्व बदलाचा फैसला झाला! न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची घोषणा

SCROLL FOR NEXT