Shivaji Maharaj Wagh Nakh news in marathi esakal
कोल्हापूर

Shivaji Maharaj Wagh Nakh: लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत?; इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा दावा, खरा इतिहास काय?

Sandip Kapde

कोल्हापूर - इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी पत्रकार परिषदेमध्ये एक महत्त्वाची माहिती उघड केली आहे. व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून केलेल्या पत्रव्यवहारात, लंडन येथून आणणारी वाघनखे ही छत्रपती शिवाजी महाराजांची नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारने लंडनमधील वाघनखं परत आणण्याचा दावा केला होता. मात्र म्युझियमने पाठवलेल्या पत्रामुळे मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत.

जनतेची दिशाभूल करू नये-

इंद्रजित सावंत यांनी सांगितले की, 1971 मध्ये ही वाघनखे लंडनमध्ये ठेवण्यात आली आहेत आणि त्यामुळे ही वाघनखे खरी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सरकारला जनतेची दिशाभूल करू नये असे आवाहन केले आहे.

सरकारचे बिंग फुटले-

सावंत यांनी म्हटले की, लंडन संग्रहालयाने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे असल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे या वाघनखांच्या प्रतिकृतीवर करोडो रुपये खर्च करू नका असे सावंत यांनी सांगितले. त्यांनी हे वाघनखे छत्रपती शिवरायांची नसल्याचे लिहणे बंधनकारक केले असताना, राजकीय नेते महाराष्ट्राची फसवणूक करत आहेत असेही म्हटले आहे.

ऐतिहासिक सत्य-

इंद्रजित सावंत यांच्या मते, लंडनमध्ये सहा वाघनखे आहेत आणि त्यापैकी एक आणून फसवणूक केली जात आहे. त्यांनी स्पष्ट केले की, अस्सल वाघनखे ही सातारा येथेच आहेत. प्रतापसिंह महाराज यांनी लंडनमध्ये वाघनखे दिल्याची माहिती हे त्यांच्या चरित्राचे हनन करण्यासाठी दिली जात आहे.

ताबडतोड स्पष्टीकरण आवश्यक-

सावंत यांनी सरकारने ताबडतोड यावर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली आहे. सातारा राजघराण्याकडे ही वाघनखे आहेत आणि ते घराणे कधीतरी स्पष्टीकरण देतील, असेही त्यांनी सांगितले. शेवटी, उदयनराजे यांनीच आता पुढे येऊन याची माहिती द्यावी अशी मागणी सावंत यांनी केली आहे.

लंडनमधील वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरली आहेत, याबाबत अनिश्चितता आहे. असं पत्र व्हिक्टोरीया अँड अल्बर्ट म्युझियमनं दिलं आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंतानी म्युझियमसोबत केलेल्या पत्रव्यवहारातून ही माहिती समोर आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संभाजी छत्रपतींचा ताफा मुंबईत अडवला, गाडीवर चढून भाषण! म्हणाले, "पटेलांचा पुतळा झाला पण..."

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर Sachin Tendulkar ची लक्ष्यवेधी पोस्ट

Dussehra Fashoin Tips: यंदा महानवमी अन् दसऱ्याला 'या' पद्धतीने करा तयारी, सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळतील

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

SCROLL FOR NEXT