कोल्हापूर

मदत राहुदे, फक्त लढ म्हणा; बदनामी न करण्याचं चिखलीकरांचं आवाहन

बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्याचे थांबवा, अन्यथा उद्‍ध्वस्त झालेला पूरग्रस्त संपून जाईल

तानाजी मस्कर

प्रयाग चिखली : आम्ही चिखलीकर (chikhali people) चुकीचे नव्हतो आणि नाही. सोशल मीडियावर (social media) व्हायरल झालेल्या बदनामीकारक पोस्ट चुकीच्या आहेत, असे आवाहन ग्रामस्थांतर्फे स्थानिक नेत्यांनी केले. महापूर (kolhapur flood) काळात ग्रामस्थांनी अन्न टाकून दिले, मदत हिसकावून घेतली, अशा खोट्या पोस्टमुळे चिखलीकर व्यथित आहेत, ही बदनामी थांबवावी, असे आवाहनही केले.

चिखलीला २०१९ मध्ये महापुराने बुडविले. २०२० मध्ये महापुराबरोबरच कोरोनाने (covid-19) वर्षभर घरी बसविले. सलग दोन वर्षे पिके कुजली, दूध व्यवसाय संपला, छोटे-मोठे व्यवसाय करून चिखलीकर उदरनिर्वाह करीत आहेत. २२ जुलैला महापुराने अवघ्या दहा तासांत होत्याचे नव्हते केले. अशा महासंकटाच्या खाईत सापडलेल्या चिखलीकरांना समजून घ्या. मदत राहू दे, मात्र फक्त लढ म्हणून ताकद देणारे शब्द हवेत. संपूर्ण महाराष्ट्राने (maharashtra) आम्हाला भरपूर मदत केली आहे. त्यातून अजून उतराई झालेलो नाही. चिखलीकर उद्धट, मग्रूर, लाचार, बेजबाबदार, ऐतखाऊ असल्याच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यामुळे चिखलीकर आणखीच व्यथित होत आहेत. ‘गोकुळ’चे संचालक एस. आर. पाटील म्हणाले, ‘‘बदनामीकारक पोस्ट व्हायरल करण्याचे थांबवा, अन्यथा उद्‍ध्वस्त झालेला पूरग्रस्त संपून जाईल.’’

रघू पाटील म्हणाले, ‘‘वादग्रस्त व्हायरल पोस्टची सत्यता जाणून व पडताळून घ्या.’’ माजी सरपंच केवलसिंग रजपूत म्हणाले, ‘‘आतापर्यंत व्हायरल झालेल्या बदनामीकारक पोस्टमधील ग्रामस्थ चिखलीकर नव्हतेच.’’ भाजप कार्यकर्ते पै. संभाजी पाटील म्हणाले, ‘‘पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम कोणीही करू नये.’’ ग्रामपंचायत सदस्य धनाजी चौगले म्हणाले, की शासनाकडून भूखंड मिळून ३२ वर्षे पूर्ण झाली, तरीही अद्याप प्रॉपर्टी कार्ड मिळाले नसल्याने पुनर्वसन रखडले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT