collector kolhapur sakal
कोल्हापूर

जिल्हाधिकाऱ्यांची सीपीआर ला अचानक भेट; अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ

डॉक्टर गायब, लसीकरण केंद्र बदलाची माहितीच नाही.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : अनेक समस्यांच्या गर्तेत असलेल्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाला (CPR) आज जिल्हाधिकारी राहुल रेखावर(collector rahul rekhawar) यांनी अचानक भेट देऊन तेथील कामाबाबत संबंधितांची झाडाझडती घेतली. भेटीत बहुंताशी डॉक्टर वेळेपूर्वीच घरी गेल्याचे आढळून आले, तर मुख्य लसीकरण केंद्राची जागा बदलल्याची माहितीही संबंधितांना नसल्याचे आढळले.

सिंधुदुर्गात (sindhudurga)अचानक ३४ डॉक्टरांच्या झालेल्या बदल्या, ५० हून अधिक डॉक्टरांना झालेली कोरोनाची लागण, त्यामुळे उपचारावर झालेला परिणाम अशा अनेक समस्यांच्या गर्तेत सध्या सीपीआरची आहे. अपुऱ्या डॉक्टरांमुळे अनेक शस्त्रक्रिया रखडल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर आज श्री. रेखावार यांनी दुपारी रुग्णालयाला भेट देऊन कामाची माहिती घेतली. सुमारे दोन तासांहून अधिक काळ त्यांनी रुग्णालयातील प्रसूतीशास्त्र वगळता अन्य इमारतीतील सर्व विभागांना भेटी देऊन कामाची पाहणी केली. त्यांच्यासोबत अधिष्ठाता प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे होते.

बाह्यरुग्ण विभागाला त्यांनी भेट दिली. बाह्यरुग्ण तपासणीची वेळ सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत पण तत्पूर्वीच काही डॉक्टर निघून गेल्याचे आढळून आले. मुख्य लसीकरण केंद्राला कुलूप लावले होते, पण केंद्र बदलल्याची माहिती त्यांना दुसऱ्या इमारतीत गेल्यानंतर सांगण्यात आली. यावरून अधिकाऱ्यांनाही या केंद्र बदलाची माहिती नव्हती. रुग्णालय परिसरात बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते, त्यावरून त्यांनी अधीक्षक व अधिष्ठाता यांना जाब विचारला. हे साहित्य हलवण्याचे आदेश त्यांनी दिले. बर्न वॉर्ड, लहान मुलांचा वॉर्ड, शवविच्छेदन विभागालाही त्यांनी भेट दिली. याशिवाय परिसरातील पाचही इमारतीतील सर्व मजल्यावर जाऊन त्यांनी त्या त्या ठिकाणच्या रुग्णांच्या व्यवस्थेची पाहणी केली.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात काही सुविधांची गरज आहे, त्याची पाहणी करण्यासाठी भेट दिली. ज्या सुविधांची गरज आहे, त्याचा अहवाल सीपीआर प्रशासनाकडून मागवला आहे. हा अहवाल आल्यानंतर आवश्‍यक त्या सर्व सुविधा तत्काळ दिल्या जातील.

- राहुल रेखावार, जिल्हाधिकारी.

११ मशिन्स तरी विभाग बंदच

एचआयव्ही व कावीळग्रस्तांवरील डायलेसिससाठी(Dialysis in cpr) सीपीआरमध्ये रुग्णालयात ११ डायलेसिस मशिन्स आहेत, पण ही सर्व मशिन्स श्री. रेखावार यांनी केलेल्या पाहणीत बंद असल्याचे आढळून आले. त्यांनी याबाबतीत संबंधितांना जाब विचारून ही मशिन्स सुरू करण्याचे आदेश अधिष्ठात श्री. दीक्षित यांना दिले.

१८ हजार दाखले प्रलंबित; डेटा ऑपरेटर्स धारेवर

सीपीआरमधून (CPR HOSPITAL)अपंगांचे दाखलेही दिले जातात. जिल्हाधिकाऱ्यांनी या विभागाला(collector rahul rekhawar) दिलेल्या भेटीत तब्बल १८ हजार दाखले प्रलंबित असल्याची माहिती पुढे आली. त्यांनी याबाबत या विभागात काम करणाऱ्या ऑपरेटर्संना धारेवर धरत दाखल्यांची निर्गत करण्याचे आदेश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: निकालाच्या आदल्या दिवशी पुण्यात निघाले कोयते; टोळक्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

Pune Assembly Election Result : मतमोजणी केंद्राच्या परिसरात तीन हजार पोलिस तैनात; उमेदवारांच्या निवासस्थानांसह पक्ष कार्यालयांतही बंदोबस्त

Majalgaon Assembly Election 2024 Result : १९९५ ची पुनरावृत्ती; का पुन्हा प्रकाशपर्व! मुस्लीम, दलित मतावर जगतापांची मदार

Sports Bulletin 22th November: पर्थ कसोटीतील पहिल्या दिवशी गोलंदाजांचे वर्चस्व ते आगामी आयपीएल हंगामाची तारीख जाहीर

Georai Crime : बूथप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

SCROLL FOR NEXT