kolhapur esakal
कोल्हापूर

'आण्णां' ची झेप शुन्यातून विश्‍वाकडे !

उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची धक्कादायक बातमी कोल्हापुरात धडकली आणि अनेक उद्योजकांना प्रतिक्रिया देण्यासाठीही शब्द उरले नाहीत.

- लुमाकांत नलवडे

उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची धक्कादायक बातमी कोल्हापुरात धडकली आणि अनेक उद्योजकांना प्रतिक्रिया देण्यासाठीही शब्द उरले नाहीत.

कोल्हापूर - दोन लेथ मशिन एकटा चालविणाऱ्या गड्याने पाहता पाहता कोट्यवधींची जाधव इंडस्ट्री उभा केली. दहा देशांत निर्यातीपर्यंत मजल मारली. एक दोन नव्हे तर उद्योजकांच्या ५ संघटनांवर वेगवेगळ्‍या पदावर काम केले. आठशे-हजार तरुणांच्या हाताला काम दिले. स्वतः सारखे तळागळातील तरुण उद्योजक बनले पाहिजेत, ही त्यांची शुन्यूतून विश्‍वाकडील झेप आज पहाटे संपली. उद्योजक आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाची धक्कादायक बातमी कोल्हापुरात धडकली आणि अनेक उद्योजकांना प्रतिक्रिया देण्यासाठीही शब्द उरले नाहीत.

फुटबॉलच्या मैदानवर किट मध्ये, शहरात साध्या शर्ट,पॅन्ट मधील आण्णा उद्योजकांच्या रांगेत कधी थ्री पीस तर कधी ब्लेझर घालून बसले की मराठी माणूस म्हणून ऊर भरून येत होता. लेथ मशिन असो किंवा व्हीएमसी सीएमसी असे स्वतः लक्ष घालून कामगारांना स्वतःची कंपनी आहे, असा विश्‍वास देणारा एक उद्योजक म्हणून आण्णांकडे पाहिले जात होते. बालपण प्रायव्हेट हायस्कूल मध्ये शिक्षण झाल्यानंतर चंद्रकांत जाधव पुढे ‘आण्णा' म्हणून ओळखू लागले.

शाळेतील बेंचवर असलेले त्यांचे मित्र डॉक्टर (डॉ.अजय केणी, डॉ.श्रीनिवास रोहिदास) होण्यासाठी झटत होते. पण आण्णांनी आयटीआय करून उद्योजक बनण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. एका लेथ मशिनवर वडिलांना हातभार लावता लावता दोन लेथ मिशिन घेतली. वाय.पी.पोवार नगरात कारखाना सुरू केला. आणि तेथून पुढे आण्णांनी मागे वळून पाहिले नाही. गोकूळ शिरगाव मध्ये एक युनिट सुरू केले. फाऊंड्री सुरू झाली. कधीकाळी दोन लेथ मशिनवर काम करणाऱ्या आण्णांनी कोट्यवधींची फाऊंड्री उभारली. सुमारे आठशेहून अधिक तरुणांच्या हाताला काम दिले.

महिंद्रा, किर्लोस्कर, स्वराज्य असा नावाजलेल्या दहाहून अधिक कंपन्यांत त्यांचे सुटेभाग पाठविले जातात. अनेक देशांत निर्यात होतात. फुटबॉलच्या मैदानवर किट मध्ये, शहरात साध्या शर्ट,पॅन्ट मधील आण्णा उद्योजकांच्या रांगेत कधी थ्री पीस तर कधी ब्लेझर घालून बसले की मराठी माणूस म्हणून ऊर भरून येत होता. लेथ मशिन असो किंवा व्हीएमसी सीएमसी असे स्वतः लक्ष घालून कामगारांना स्वतःची कंपनी आहे, असा विश्‍वास देणारा एक उद्योजक म्हणून आण्णांकडे पाहिले जात होते.

वेगवेगळ्या उद्योगात जाण्याची आण्णांची धडपड नेहमीच दिसून येत होती. त्यातूनच त्यांनी ‘छंद माझ्या प्रितिचा’ हा चित्रपट निर्माता म्हणून साकारला. सुमारे अडीच कोटींचे बजेट खर्चून चित्रपट सृष्टीत ही जाण्याचा एक प्रयोग त्यांनी केला. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन,उद्योग को-ऑपरेटीव्ह संस्था, गोशिमा आणि महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे संचालक म्हणून ही ते कार्यरत होते. कधी ही ‘निगेटीव्ह’ चर्चा न करता प्रत्येक गोष्ट ‘पॉझिटीव्ह’ घेणारे आण्णा प्रत्येकाचे आयुष्य उभारण्यासाठी नेहमीच धडपडत होते. जाधव इंडस्ट्रीज मधून अनेकांना उभारी दिलीच ;पण नवोदीत तरुणांना, महिलांनाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक, मार्केटींगसाठीही उद्योजकांच्या माध्यमातून सहकार्य केले जात होते.

आपण केलेल्या कामाचे मार्केटींग करण्यापेक्षा एकाचे आयुष्य उभा केल्याचा आनंद त्यांना अधिक होता. यशस्वी उद्योजकांसाठी एखादी बातमी करतानाही त्यांच्याकडून स्वतःचे नाव प्रसिद्ध करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. तळागाळातील उद्योजक तरुणच हे करू शकतो असेही त्यांचेच मित्र मोठ्या अभिमानाने सांगत होते. उद्योजक आमदार बनविण्यासाठी औद्योगिक संघटनांबरोबरच तळागाळातील व्यक्तींनी त्यांच्यावर प्रेम केले आणि एक उद्योजक कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघातून विजयी झाला.

काही दिवसांपूर्वी बिडिशेप विक्री करणारी सर्वसामान्य महिला त्यांना भेटली. त्यावेळी महिलेच्या उत्पादनाला मार्केट मिळण्यासाठी आमदारांनी स्वतः आजारी असतानाही चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि त्यांचे मित्र संजय शेटे यांच्याशी संपर्क साधून मार्केटची व्यवस्था करण्याच्या सुचना दिल्या. एवढंच नव्हे तर पुन्हा आठवड्यांनी त्याचा पाठपुरावा केला. तेंव्हा इचलकरंजी-जयसिंगपूर परिसरात त्यांचे उत्पादन विक्री होत होते. एक आमदार, कोट्यवधींची मालमत्ता असलेला उद्योजक एका सर्वसामान्य महिलेने तयार केलेले उत्पादन विक्रीसाठी अशी पडद्याआड मदत करीत होता. आता मात्र सर्वसमान्यांना स्वतःच्या पायावर उभा करणारा उद्योजक ‘आण्णा’ राहिला नाही.

‘आमदारकी’ वेगळी ‘उद्योजक’ वेगळा

आमदार म्हणून काम करताना ते मुंबईत मंत्रालयातील काम झाले की आमदारकीचे लेबल बाजूला ठेवत होते. स्वीय सहाय्यकासह कर्मचाऱ्यांनाही त्यांनी ‘तुम्ही गाडीतच थांबा, हे माझ्या कंपनीचे काम आहे,’ असे ते आवर्जून सांगत होते. त्यामुळे उद्योग वेगळा आणि राजकरण वेगळा ठेवणारा हा उद्योजक आमदार आज मध्यरात्री आपल्यातून निघून गेला आणि पाहता पाहता अनेक उद्योजकांसह कर्मचारी, मतदार संघातील मतदार, यांच्या स्टेटसवर, सोशल मीडियावर साधा माणूस म्हणून आदरांजली वाहण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसे शिंदेंच्या लढतीचा आदित्य ठाकरेंचा फायदा

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: दुसऱ्या फेरी अखेर माहीममध्ये अमित ठाकरे पिछाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT