BJP MLA Gopichand Padalkar esakal
कोल्हापूर

'धनगरांनी शेळ्या-मेंढ्या राखायचं बंद केलं, तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल' पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य

सकाळ डिजिटल टीम

सरकारच्या बाजूने धनगर उभा राहिला आहे. सरकारने धनगर समाजाच्या संदर्भात एसटीचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणीही पडळकर यांनी केली.

कोल्हापूर : भाजपचे विधान परिषदेचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) हे आपल्या वादग्रस्त विधानामुळं नेहमी चर्चेत असतात. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी ते सातत्याने शासन दरबारी आवाज उठवत आहेत. मात्र, सध्या पडळकर एका वादग्रस्त विधानामुळे पुन्हा चर्चेत आले आहेत.

कोल्हापूरमधील (Kolhapur) रास्ता रोको आंदोलनाला भेट देत आमदार पडळकर यांनी आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलंय. आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आज धनगर बांधवांच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केलं.

मेंढपाळाला गुराढोरा सारखं मारलं जातं

पडळकर म्हणाले, धनगरांनी मेंढ्या, शेळ्या राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल. धनगर समाज आठ-आठ दहा-दहा महिने मेंढरं घेऊन बाहेर राहतो. कुठं त्याला घर?. महाराष्ट्रातील जनतेला चांगल्या प्रतिचे मांस मिळावे म्हणून दिवसाला 35 किलोमीटर तो चालतोय; पण कुणाच्या रानात चुकून मेंढरं गेली तर मेंढपाळाला गुराढोरा सारखं मारलं जातं.

एसटीचा जीआर तत्काळ काढा

पोलिस दखल घेत नाही, हा अन्याय आम्ही का सहन करायचा? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एसटीतून धनगर समाजाला आरक्षण ही आमची पहिली मागणीये. धनगराचं पोरगं शिकलं तर त्याला मेढरं संभाळायची वेळ येणार नाही. सरकारच्या बाजूने धनगर उभा राहिला आहे. मतदान करायला आम्ही पाहिजे. सरकारने धनगर समाजाच्या संदर्भात एसटीचा जीआर तत्काळ काढावा, अशी मागणीही पडळकर यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur School Crime: आरोपी अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी! नेमकं काय घडलंय? जाणून घ्या

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

Israel-Hezbollah Conflict: इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 लोक ठार, 300 हून अधिक जण जखमी

Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स; खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी

SCROLL FOR NEXT