corona patients cases registered less in kolhapur but storage of remdesivir medicine for demand of future in kolhapur 
कोल्हापूर

कोरोना ओसरतोय ; औषधांचा खप निम्म्यावर

युवराज पाटील

कोल्हापूर : जिल्ह्याच्या विविध भागांत रुग्णसंख्या मोठी होती. आता मात्र कोरोनाचा कहर कमी झाल्यामुळे घसादुखीपासून होणारा संसर्ग तसेच तापावरील गोळ्या औषधांची विक्री कमी झाली आहे. पन्नास टक्क्‍यांहून अधिक खप कमी झाल्याचे औषध दुकानदारांकडून सांगण्यात आले. रेमडेसिव्हरची मागणीही घटली असून, आता मुबलक साठा उपलब्ध आहे. ऑक्‍सिमीटर, थर्मामीटर गण आणि मास्कचा खपही कमी झाला आहे. जुलै ते सप्टेंबरअखेर हाउसफुल्ल असणारी सरकारी, निमसरकारी, खासगी रुग्णालयतही आता बेड उपलब्ध आहेत. 

जुलै ते सप्टेंबर २०२० कोरोनाची स्थिती गंभीर होती. कोरोनाचा सर्वाधिक फैलाव झालेला काळ होता. अनेक रुग्णांना कोरोनाची बाधा झाली. संख्या झपाट्याने वाढू लागली. जिल्ह्यात दिवसाकाठी एक हजार ते बाराशे रुग्ण सापडत होते. मोठ्या प्रमाणात साथ फैलावत गेली तशा अनेक समस्या जाणवू लागल्या. रुग्णांना बेड मिळेना, ऑक्‍सिजन मिळेना आणि गरज आहे अशा रुग्णांना व्हेंटिलेटर मिळणेही मुश्‍कीलच झाले होते. अनेक रुग्णांचा उपचारासाठी दाखल करतानाच मृत्यू झाला, तर काही व्हेंटिलेटरअभावी मृत झाले.

दवाखान्यात ॲडमिट करायलाही जागा नसल्याने अनेक रुग्ण वाटेतच दगावले, अशी गंभीर स्थिती कोल्हापुरात पाहायला मिळाली. बघता बघता अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला, तसेच ज्येष्ठ नागरिकांचाही मुत्यू झाला, असे चित्र कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी पाहायला मिळाले.

रेमडेसिव्हरसाठी रात्रभर ताटकळण्याची वेळ

कोरोनाच्या काळात रेमडेसिव्हर नावाचे इंजेक्‍शन प्रभावीपणे काम करत आहे. त्यामुळे या इंजेक्‍शनची गरज असलेल्या रुग्णांची संख्या वाढत गेली. अचानक संख्या वाढत गेली. सरकारी यंत्रणेने रेमडेसिव्हर खरेदी केल्याने अनेक ठिकाणी या इंजेक्‍शनचा तुटवडा निर्माण झाला होता. १५ सप्टेंबरपासून साथ आटोक्‍यात आल्याने आता रेमडेसिव्हर उपलब्ध आहेत. घसादुखीमुळे होणारा संसर्ग तसेच तापाच्या गोळ्यांच्या खपातही घट झाली आहे. ऑक्‍सिमीटर, थर्मल गन, रक्त पातळ करणारी औषधे, ॲिन्टबायोटिकला मागणी राहिलेली नाही. कोरोनाच्या भीतीपोटी घसादुखीसह प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या औषधांचा जून ते सप्टेंबर या काळात मोठ्या प्रमाणात विक्री होत होती. त्यांनतर आता रुग्णसंख्या कमी होत जाईल तशी सर्व औषधांची विक्रीही कमी होत आहे.

"कोराना रुग्णांची संख्या जशी कमी होत आहे तशा औषधांचा खप कमी होत आहे. औषधांची मागणी ५० टटक्‍यापेंक्षा अधिक कमी झाली आहे. रेमडिसिव्हर नावाच्या इंजेक्‍शनचा मागणी करुन अनेक रुग्णालयांनी त्याचा साठा करुन ठेवला आहे. नजीकच्या काळात गरज नसतानाही अनेकांना ही इंजेक्‍शन दिली जाण्याची शक्‍यता आहे. गरज असलेल्या रुग्णांनाच इंजेक्‍शनचा वापर व्हावा."

- महेश सावंत, औषध विक्रेते

"गेल्या आठवड्यापासून ताप तसेच घसादुखीवरील औषधांची मागणी कमी झाली आहे. रेमडेसिव्हर इंजेक्‍शनचा पुरेसा साठा आहे. नियमित ओपीडी सुरू झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे औषधांची मागणी सुरू होईल."

- विशाल चव्हाण, घाऊक औषध विक्रेता

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT