चंदगड - कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असल्याने जागतिक पातळीवर आहाकार माजला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याने चंदगड तालुक्यातील काजिर्णे गावाने तुम्ही जगा, अन् आम्हालाही जगू द्या अश कळकळीचे विनंती केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावामध्ये लाॅकडाऊन केले आहे. बेळगाव-वेंगुर्ला मार्गाच्या मुख्य रस्त्यापासून तीन किलोमीटरच्या आतमध्ये काजिर्णे गाव वसले आहे. लाॅकडाऊनच्या काळातही बाहेरील नागरिक, तुरळक वाहने आणि दुचाकीस्वार येत गावाच्या प्रवेशद्वारच बंद करण्यात आले आहे. गावाच्या प्रवेशद्वारावरच ग्रामस्थांनी 'तुम्ही जगा अन् आम्हालाही जगू द्या' अशा आशयाचा फलक लावण्यात आला आहे.
कोरोना हा संसर्गतून फैलावत असल्याने ग्रामस्थांनी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. गावमध्ये येण्यास बंदी नसली तरी बाहेरून येणार्या नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे का? याबाबत चौकशी करण्यात येत आहे.गावबंदी करण्यात आल्याने इतर ठिकाणांहून येणार्या जाणार्या पायबंद घालण्यात आला आहे.
चंदगड, कानूर आणि अडकूर ही बाजाराची गावे जवळ असल्याने अनेक फिरते व्यापारी गावामध्ये प्रवेश करत होते. व्यापार्यांकडून कोणत्याही प्रकारची सुरक्षिततेची काळजी घेतली जात नसल्याने रस्ता बंद करून प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. यासाठीच गावाच्या प्रवेशद्वारावर 'तुम्ही जगा अन् आम्हालाही जगू द्या' असा फलक लावून नागरिकांना कळकळीची विनंती करण्यात आली आहे.
सजग नागरिक
गावात कोरोनाव्हायरसविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस पाटील वसंत सुतार, ग्रामपंचायत सदस्य रवळनाथ गावडे, शामराव उपळकर, अनंत पाटील, गौतम कांबळे, संतोष गावडे, राजू चौकुळकर यांनी विविध माध्यमातून खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
मुंबई, पुणेकरांना आवाहन
काजिर्णेतील अनेक नागरिक नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई, पुणे आणि गोवा येथे वास्तव्यास आहेत. लाॅकडाऊनच्या काळात बाहेर राहणारे नागरिक गावात आल्याने त्यांनी आरोग्य तपासणी करून घ्यावी असे ग्रामस्थांनी आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.