लॉकडाउन File photo
कोल्हापूर

कोल्हापुरात चौथ्या स्तराचे निर्बंध कायम

सुनील पाटील

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 13.8 टेक्‍क आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील ग्रामीण भागात शासनाने दिलेल्या चौथ्या स्तरामधील नियम व अटींचे तंतोतत पालन करावे. तसेच अत्यावश्‍यक सेवा वगळता इतर आस्थापना बंद ठेवाव्या लागतील, असे आदेश प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आज ऑनलाईन झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर डॉ. बलकवडे यांनी कोल्हापूर जिल्हा ग्रामीण भागासाठी वेगळा आदेश जारी केला आहे. 

डॉ. बलकवडे यांनी दिलेल्या आदेशात म्हंटले आहे की, कोल्हापूर शहरातील कोरोना पॉझिटिव्हीटी दर हा 9.09 टेक्‍क आहे. तर, जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी दर 13.08 इतका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पॉझिटिव्हीटी ही दहा टेक्‍कपेक्षा जास्त आहे. त्यामुळे, जिल्ह्यात अत्यावश्‍यक सेवा वगळता चौथ्या स्तरामध्ये नमूद केलेल्या सर्व दुकाने व इतर आस्थापना बंद ठेवाव्या लागतील. यामध्ये, मॉल्स, सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्‍स, सिंगल स्क्रिन, नाटयगृह, धार्मिक कार्यक्रम, राजकीय, सांस्कृतिक, करमणुकीचे कार्यक्रम, खासगी कार्यालये बंद ठेवावी लागतील. तर सोमवार व रविवार कडक लॉकडाऊन असेल. तर, सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, फिरणे व सायकलिंग शनिवार व रविवार वगळता इतर दिवशी पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत खेल राहिल.

लग्नसमारंभासाठी 25 व अंत्ययात्रेसाठी 20 लोक उपस्थित राहू शकतात. व्यायामशाळा, केशकर्तनालय, दुकाने, ब्युटी पार्लरस, स्पा, वेलनेस सेंटर्स सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत पन्नास टक्के क्षमतेने सुरु ठेवावीत. याशिवाय ग्रामीण भागात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पन्नास टेक्‍क क्षमतेने सुरु राहिल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Video: चार सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; स्मृती इराणी घेणार सभा; नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : शिवसेना शिंदे गटाची जाहिरात, उबाठाला डिवचण्याचा प्रयत्न?

गोफण | बॅगा तपासल्या अन् पैसे हरवले

Beed Assembly Election News : एकीकडे स्थलांतर दुसरीकडे मतदानाचे नियोजन; मुकादमांच्या मध्यस्थीने प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे प्रयत्न

महाविकास आघाडीच्या 'त्या' सभेला शरद पवार का आले नाहीत? सांगण्यासारखंच काय असतं तर..; काय म्हणाले उदयनराजे?

SCROLL FOR NEXT