The Cost Of The Wedding Was Paid To The Village School Kolhapur Marathi News 
कोल्हापूर

लग्नाच्या वरातीचा खर्च दिला गावच्या शाळेला

अशोक तोरस्कर

उत्तूर : लग्नसोहळा म्हटले की, ग्रामीण भागात उत्साह काही औरच असतो. डीजे साऊंडचा धुमधडाका, फटाक्‍यांची आतषबाजी असते. साहजिकच सोहळ्यात काहीही कमी पडणार नाही याची पुरेपूर दक्षता घेतली जाते. गावातील लग्न वा तत्सम सोहळ्यात दिसणारे हे चित्र बदलविण्याचा प्रयत्न मासेवाडी (ता. आजरा) येथील परीट परिवाराने केला आहे. त्यांनी लग्नातील वरातीचा खर्च गावातील प्राथमिक शाळेसाठी केला. या निमित्ताने एक नवा विधायक पायंडा पडला आहे. 

दिनकर गुंडू परीट यांचा मुलगा विवेक यांचा विवाह कोमल हिच्यासी मंगळवारी (ता. 16) झाला. परीट समाजाने सामाजिक प्रश्‍नात प्रगल्भता दाखवत वरातीवर उधळपट्टी करण्यापेक्षा हा खर्च शाळेसाठी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1 ली ते 8 वीच्या सर्व विद्यार्थ्यांना 30 हजार रुपये किमतीचे लेखन, वाचन व फर्निचरचे साहित्य दिले. यावेळी सरपंच पांडुरंग तोरगल्ले, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा संगीता परीट, पिंटू परीट, शिक्षक एकनाथ आजगेकर, तसेच रवींद्र येसादे उपस्थित होते. 

थाट बदलण्याचा प्रयत्न
ग्रामीण भागात लग्न वा तत्सम सोहळे थाटात साजरे करण्याची परंपरा आहे. त्याकरिता प्रसंगी जमीन गहाण ठेवून कर्जही काढले जाते. असे असूनही लग्नासारख्या सोहळ्यात थाट काही केल्या कमी होत नसल्याचे चित्र आहे. हे बदलण्याचा प्रयत्न परीट परिवाराने केला आहे. 
- एकनाथ आजगेकर, शिक्षक. 

मानसिकता बदलविण्याचा प्रयत्न
डीजेची ग्रामीण भागात चांगलीच धूम आहे. बेधुंद होऊन वरातीत नाचण्यात सारे मग्न होत असल्याने त्यावरून अनेकदा वादही उद्‌भवतात. या वादाचे रूपांतर काही वेळा हाणामारीत होते. ही मानसिकता बदलविण्याचा प्रयत्न परीट परिवाराने केला आहे. 
- पांडुरंग तोरगल्ले, सरपंच. 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election: 'मराठी मुंबई हवी असेल, तर घरी बसवा 'पटेल'; मराठी एकीकरण समितीच्या घोषणेनं वातावरण तापलं!

Champions Trophy 2025: पाकिस्तानने POK वरून भारताची 'खोड' काढली! ICC ने त्यांना 'जागा' दाखवली

Devendra Fadnavis: फडणवीसांनी पण घेतली भर पावसात सभा; म्हणाले, "आता ही सीट निवडूनच येणार"

Bhosari assembly elections 2024 : भोसरी विधानसभा शांतता, सलोखा राखण्यासाठी प्रयत्न करणार : अजित गव्हाणे

Fact Check: शिवसेना (उबाठा) मुस्लिम महिलांना 6000 रुपये देणार, व्हायरल पोस्टमधील तो दावा खोटा

SCROLL FOR NEXT