माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण sakal
कोल्हापूर

'ईडी'ची विश्वासार्हता धोक्यात; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - केंद्रीय तपास यंत्रणांची विश्वासार्हता धोक्यात आली आहे. तोडपाणी करण्यासाठी धाडी टाकल्या जातात की काय ही शंका आहे. या पद्धतीने जाणीवपूर्वक धाड सत्रातील इवेंट केला जातो. तोडपाणीसारख्या प्रकाराला शंका घ्यायला वाव मिळतो, अशाने तपास यंत्रणांची विश्वासार्हता शिल्लक राहणार नाही. एखादा दोषी आहे, हे न्यायलयासामोर सिद्ध न करता केवळ प्रसिद्धीसाठी धाड प्रकिया सुरु आहे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आज कोल्हापुरात ते बोलत होते.

ते म्हणाले, कोविडच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लोकांना कोरोना लस विकत घ्यायला भाग पाडले. कोरोना लसींची किंमत वाढवली ही मोदी सरकारची अक्ष्यम चूक आहे. केंद्र सरकारने लस विकत घेऊन ती राज्यांना विकत दिली असती तरी चालले असते. कोविड लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मोदी सरकराने ही जाहिरातबाजी थांबवावी असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

ते म्हणाले, जगातील प्रत्येक देशाने कोविड लस मोफत दिली. परंतु कुठेही देशाच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रध्यक्षांचा फोटो छापला नाही. मोफत लसीकरण ही केंद्र सरकराची जबाबदारी आहे. मात्र लसीकरणाची ही जाहिरातबाजी मोदी सरकराने थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अनेकांनी यावरून मोदींचा फोटो काढवा अशी मागणी केली आहे. लसीकरण हा इव्हेंट नाही ती एक प्रक्रीया आहे. फोटो छापायचे आदेश कुणी दिली याची चौकशी व्हावी. यापुढे तिसऱ्या टप्प्यातील लसीकरण करणार का? हे केंद्र सरकारने जाहीर करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ते म्हणाले, मोदी सरकारच्या काळात अर्थव्यवस्था ढासळली आहे. विकास दर घसरला आहे. कोविड-१९ च्या आधीपासून अर्थव्यवस्थेला गळती लागली आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढले आहेत. यातून विकासात विषमता निर्माण झाली आहे. जागतिक पातळीवरील उपासमारीचा आलेख काढला तर, त्यात ११६ देशांची वर्गीकरण केले जाते. ११६ देशांमध्ये भारताचा यात १०१ क्रमांक लागला आहे. जो याआधी ९० व्या क्रमाकांवर होता. पालकमंत्री सतेज पाटील हे कॉंग्रेसरचे कर्तुत्ववान नेते आहेत त्यांना भविष्य उज्जवल आहे. मी जर मुख्यमंत्री असतो तर सतेज पाटील कॅबिनेट मंत्री असते असेही ते एका प्रश्नावर म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Ease of Doing Business: जागतिक बँकेच्या 'ईझ ऑफ डुईंग बिझनेस' अहवालात भारताची मोठी झेप; जाणून घ्या काय आहेत कारण?

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

SCROLL FOR NEXT