covid 19 Patients die from will be audited information Rural Development Minister Hasan Mushrif 
कोल्हापूर

‘चंद्रकांत पाटील यांना सहकार, महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते समजलेच नाही"

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे, सध्या दवाखान्यात ॲडमिट असलेल्या आणि कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांचे ऑडिट केले जाणार असल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी कोरोना रुग्णांची माहिती घेतली.
ग्रामविकास मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, ‘‘राज्यात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या ऑडिट करण्याचा शासनाचा निर्णय आहे. दरम्यान, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे, ही समाधानाची बाब असली तरी जनतेने पुढील धोका टाळण्यासाठी आवश्‍यक खबरदारी घेतले पाहिजे. लोकांनी मास्क, सुरक्षित अंतर ठेवणे आणि सॅनिटायझरचा वापर केला पाहिजे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेने भविष्यात कोरोनाची दुसरी लाट येईल असा अंदाज व्यक्त केला आहे.

त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेतली पाहिजे. जिल्हा प्रशासनाने बेडची संख्या वाढवणे, ऑक्‍सिजन बेड वाढवणे, ऑक्‍सिजन पुरवठा सुरळित करणे, रेमडीसीविर इंजेक्‍शन उपलब्ध करावे.’’ जिल्हाधिकारी दौलत देसाई, पालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलिीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त किशोर पवार, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊ गलांडे, अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत मस्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.

दादांना खाते समजलेच नाही
मुश्रीफ म्हणाले, ‘चंद्रकांत पाटील यांना सहकार, महसूल, सार्वजनिक बांधकाम खाते समजलेच नाही. आता त्यांनी राज्य बॅंक किंवा जिल्हा बॅंकवरील कारवाई नेमकी काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. राज्य बॅंकेचा घोटाळा म्हणजे काय आहे, हे समजून घेतले पाहिजे. एखाद्याला १०० कोटींचे कर्ज दिले असेल आणि तोट्यात गेली असेल तर त्यावरील कर्ज वसूल करता येते. त्याची यंत्रणा विक्री करणे किंवा शासनाकडून त्याला थकहमी असते, यातून त्याची भरपाई होते. हे त्यांना कळलेच नाही.’’

संपादन -अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT