कोल्हापूर

धक्कादायक! कोवीड सेंटरचा घोटाळा उघड; TV, AC,CCTV कॅमेरे गायब

डी. आर. पाटील

शिरोळ (कोल्हापूर) : लोकवर्गणीतुन तसेच पीएम केअर फंडातुन, मौजे आगर हददीत उभारलेल्या, श्री सिध्दी विनायक कोवीड सेंटरमधील, कांही साहित्य, लोकप्रतिनिधींच्या घरात असल्याचा आरोप होत आहे. याबाबत प्रशासनातील कांही अधिकारी आपली जबाबदारी ढकलत आहेत. कोरोनाच्या संकट काळात, ऑक्‍सीजन, बेड, व औषधे मिळत नाहीत म्हणुन, नागरीक टाहो फोडत असताना, सिध्दी विनायक कोवीड सेंटरचा खेळखंडोबा कोण करीत आहे?

covid center fraud case in shirol covid 19 kolhapur marathi news

गेल्या वर्षी सुमारे 65 लाखाहुन अधिक लोकवर्गणी गोळा करुन, मोठया थाटामाटात, सिध्दी विनायक कोवीड सेंटरचा शुभारंभ झाला. शुभारंभ झाल्यानंतर याठिकाणी प्रशासनाकडुन, तज्ञ डॉक्‍टर उपलब्ध न झाल्याने, पहिल्या दिवसापासुनच पनवती लागली. आणि दोनच दिवसात हे कोवीड सेंटर बंद पडले. या कोवीड सेंटरमध्ये पीएम केअर फंडातुन सहा व्हेंटीलेटर उपलब्ध झाली होती. टिव्ही, एसी, सीसीटिव्ही कॅमेरे, फर्निचर, कॉंम्प्युटर, शंभर बेड आदि साहित्य याठिकाणी होते. या साहित्याबाबत, प्रशासनातील अधिकारी वेगवेगळी माहिती देत आहेत. यामुळे याठिकाणचे टिव्ही, एसी, सीसीटिव्ही कॅमेरे आदि साहित्य कोणाच्या घरात आहेत. याबाबत माहिती देण्यास प्रत्येक अधिकारी हात वर करीत आहेत. सध्या याठिकाणी केवळ बेड व रुग्नाला ऑक्‍सीजन लावण्याकरीता केलेले पायपिंग आहे.

सध्याच्या कोरोनाच्या काळात, ऑक्‍सीजन व व्हेंटीलेटर अभावी, कोरोना रुग्नांचा मृत्यु होत असताना, तालुकयाच्या लोकप्रतिनिधींनी या कोवीड सेंटरकडे दुर्लक्ष केल्याने, नागरीकांतुन तिव्र संताप व्यक्‍त केला जात आहे. या सेंटरचा झालेला खेळखंडोबाला जबाबदार कोण? असा जाब नागरीकांतुन विचारला जात आहे.

ती व्हेंटीलेटर जमा

आंदोलन अंकुशचे प्रमुख धनाजी चुडमुंगे यांनी बुधवारी व्हेंटीलेटरचा प्रश्‍न ऐरणीवर आणला असता, बुधवारी सायंकाळीच, ती व्हेंटीलेटर ग्रामीण रुग्नालयाकडे जमा झाली आहेत. याबाबत माहिती देताना, ग्रामीण रुग्नालयाचे प्रमुख डॉ कुंभोजकर म्हणाले, प्रशासनातील अधिकारी व मंत्री महोदय यांच्या सांगण्यावरुन जयसिंगपूर येथील पायोस रुग्नालयास व्हेंटीलेटर देण्यात आली होती. तथापी सदरची व्हेंटीलेंटर तांत्रिक त्रुटी असल्याने, संबंधित रुग्नालयाने वापरली नाहीत. ती आपल्याकडे बुधवारी जमा झाली आहेत.

हेही वाचा- रावणेश्‍वर, पद्माळा ५४२ रुपये कर! अन् राजर्षी शाहूंचा आदेश

शासनाचे व्हेंटीलेटर कॉंम्प्युटर व मेडीसीन इत्यादी साहित्य होते. सेंटर बंद झाल्यानंतर हे साहित्य आपल्याकडे जमा आहे. अन्य साहित्य लोकवर्गणीतुन मिळाले होते. व त्यावेळी त्याची देखरेख जयसिंगपूर नगरपरीषद करीत असल्याने, अन्य साहित्य कोठे आहे? याची आपल्याला माहिती नाही.

डॉ प्रसाद दातार तालुका वैद्यकिय अधिकारी

याठिकाणी स्वच्छतेकरीता जयसिंगपूर नगरपरीषदेचे कर्मचारी दिले होते. त्याठिकाणी कोणकोणते साहित्य होते? याची आपल्याला कल्पना नाही. तसेच त्याठिकाणचे उर्वरीत साहित्य आपल्याकडे कोणत्याही अधिकाऱ्याने जमा केलेले नाही.

टिना गवळी, मुख्याधिकारी जयसिंगपूर नगरपरीषद

गुन्हे दाखल करावेत

याठिकाणचे साहित्य कोणाच्या घरात आहे याचा तपास पोलीसांनी करावा. तसेच या कोवीड सेंटरची जबाबदारी कोणाकडे दिली होती. याची माहिती प्रशासनाने द्यावी आणि संबंधितावर तात्काळ गुन्हा दाखल करावा

धनाजी चुडमुंगे आंदोलन अंकुश

covid center fraud case in shirol covid 19 kolhapur marathi news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT