कोल्हापूर : सध्या सगळीकडे कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे. यासंदर्भात अनेक समज- गैरसमज आहेत. हे लसीकरण करत असताना ही नेमकी लस कशी ठेवली जाते. त्याचा आपल्याला काही धोका होतो का हे पाहण्यासाठी कोल्हापूरातील शासकीय सेवा रूग्णालय कसबा बावडा येथे पाहणी केली यावेळी अधिपरिचारिका ज्योती बनसोडे, दीपा शिंदे ,दीपाली कांबळे यांनी कोविड लस चैन काय आहे याविषयी माहिती जाणून घेतली . ही लस खरच सुरक्षित आहे का ? ही लस आणल्यापासून ते लस घेणाऱ्या पर्यंत त्याची नेमकी काय चैन आहे घ्या जाणून..
अशी आहे लस चैन
फ्रोजन आईस पॅक :
फ्रोजन आईस पॅक म्हणजे बर्फाचा असा गोळा जो लस सुरक्षित ठेवण्यास मदत करतो. हा दगडासारखा कडक असतो. जो पंधरा ते वीस सेंटी ग्रेटला बनवला जातो याचा वापर डायरेक्ट केला जात नाही तर पंधरा ते वीस मिनिटं बाहेर ठेवल्या जातो. याचा क्रॅकर साऊंड आल्यानंतर प्रॉपर व्हॅक्सिंगसाठी वापरले जातात. व्हॅक्सिंग कॅरियर मध्ये चारी बाजूला तो ठेवला जातो.त्यानंतर ती लस घेणाऱ्यापर्यत व्हॅक्सिंग नेली जाते.
डिप फ्रिजरचा उपयोग :(आइसलँड रेफ्रिजरेटर)
ज्या डिपफ्रिजर मध्ये आईस पॅक बनवला जातो. त्याचे तापमान मायनस 15 ते मायनस 20 डिग्री सेल्सिअस मध्ये असते. हा फ्रिज मॉनिटर करत असतो. डिप फ्रिजरला सेपरेट स्टॅबिलायझर अटॅच आहे. हे मशीन लसीकरण ठेवण्यासाठी वापरले जाते ज्यामध्ये covid-19 लस ठेवली जाते. या आइसलँड चे मॉनिटरिंग करण्यासाठी जिओआय(GOI-गव्हर्मेंट ऑफ इंडिया) यांनी EVIN (इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सिन इंटेलिजंट नेटवर्क) हे सॉफ्टवेअर बसवले आहे. या मशीनमध्ये २२८ डिग्री सेंटीग्रेटरला टेम्परेचर असते.
EVIN असे करते काम
:
डिप फ्रिजरमध्ये बिघाड झाला असल्यास त्याचा अलार्म वाजला जातो. हाअलार्म गव्हर्नमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांना डायरेक्ट मिळतो. शिवाय लसीकरणाचे मॉनिटरिंग इन्चार्ज त्यांच्याकडे आहे त्यांना मोबाईल वरती मेसेज येतो. त्यानंतर त्यावर लगेच कारवाई केली जाते. या फ्रीजर मध्ये वेगवेगळ्या लस्सी ठेवण्यात आल्या आहेत. त्यासाठी हॉस्पिटलमध्ये चार्ट लावण्यात आला आहे. लसी दोन प्रकारे ठेवल्या जातात.यामध्ये बास्केट मध्ये बास्केटच्या खाली अश्या पध्दतीने ठेवल्या जातात.
अशी ठेवली जाते कोवीड लस
कोवीड लस ठेवण्यासाठी वेगवेगळे कंपाउंड केलेले आहेत. त्यासाठी वेगळे बास्केट तयार करण्यात आले आहे. त्या बास्केटमध्ये ही लस
ठेवण्यात येते.ही लस पॅक बंद ठेवली जाते. शिवाय वापरलेली लस चोवीस तासांसाठी मॉनिटरिंग करण्यासाठी ठेवली जाते. या बास्केटमध्ये टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी थर्मामीटरची सोय करण्यात आली आहे.
किती लसींचा साठा ठेवला जातो
या फ्रीजरमध्ये तीन हजार पर्यंत लसीकरण ठेवण्याची सुविधा आहे. दिवसाला किमान तीनशे लसी वापरल्या जातात. यासाठी आठवड्याचे लसीकरण मागवले जाते.
कुठे आहे लसीचा साठा
आरोग्य अधिकारी ऑफिस मध्ये लस भांडारमध्ये ठेवल्या जातात. आणि आठवड्याला शासकीय रुग्णालयात पाठवल्या जातात.
कोल्ड बॉक्सचा वापर :
ज्यावेळी डिप फ्रिजर खराब होतो किंवा त्यामध्ये काहीतरी बिघाड येते अशावेळी कोल्ड बॉक्स चा वापर केला जातो. बहात्तर तासापर्यंत या कोल्ड बॉक्समध्ये लसी ठेवल्या जातात आणि जर मशीन रिपेरी नाही झाले तर जवळच्या लसीकरणात केंद्रावर या लसी पोहचवल्या जातात.
आपत्तीकालीन असाही बोर्ड
हॉस्पिटल मध्ये लसीकरण्याच्या संदर्भात कोणतीही आपत्ती आली तर त्या त्या डिपार्टमेंट विभागाशी संबंधित डॉक्टरांशी संपर्क करण्याची सुविधा आहे. यामध्ये कोल्ड चेन व्यवस्थापक, आरोग्य अधिकारी, तांत्रिक बिघाड दुरुस्त करणारे अधिकारी, विद्युत विभाग, अग्निशामक, कोल्ड चेन कॉइन, इमर्जन्सी कॉल डिस्प्ले करण्यात आले आहेत. तसेच व्हॅक्सिंग संदर्भात माहिती पोस्टर स्वरूपात देण्यात आली आहे. अशाप्रकारे ही लस सुरक्षित असून यापासून कोणताही धोका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.