असळज : मांडुकली येथे कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर रस्त्याच्या मध्यभागी लटकणारा पाळणा मृत्यूची टांगती तलवार बनला होता. तो मार्गावरून हटवून टॉवरकडील बाजूला ओढून दोरखंडाने टॉवरला बांधल्यामुळे धोका टळला आहे.
मांडूकली येथे जलविज्ञान प्रकल्प उपविभाग कोल्हापूरचे सरिता मापन केंद्र आहे. या केंद्रापासून थोड्याच अंतरावर असणाऱ्या कुंभी नदीच्या पात्रातून प्रवाहीत होणारा पाण्याचा विसर्ग व प्रवाहाची गती मोजण्यासाठी रोपे-वे उभारला होता. मात्र सध्या कुंभी नदीच्या पाण्याचा विसर्ग मोजण्याची व्यवस्था येथे नसल्यामुळे सरिता मापन केंद्राच्या रोपवेची वापराअभावी दुरवस्था झाली आहे.
दोरीवरचा हा झुलता पाळणा रस्त्याच्या मध्यभागी लटकत होता. पावसाळ्यात दरवर्षी तालुक्यात होणाऱ्या वादळी वाऱ्याने गंजलेल्या दोरीवर लटकणारा हा पाळणा नेहमीच वर्दळ असणाऱ्या या मार्गावर मृत्यूची टांगती बनला होता. त्यामुळे मोठा अनर्थ होण्यापूर्वी संबधित विभागाने हा पाळणा काढावा अशी मागणी वाहनधारकांमधून होत होती.
जलविज्ञान प्रकल्प उपविभाग कोल्हापूरचे कनिष्ठ अभियंता एस. डी. लोकरे, अभय पळसपकर, वाहनचालक भगवान पोवार, सेवानिवृत्त गेजखलाशी गणपती सातपुते, मयूर पाटील यांनी मांडुकली येथील हंबीराव पडवळ यांच्या सहकार्याने लटकणारा पाळणा राज्यमार्गावरुन हटवून टॉवरकडील बाजूला ओढून दोरखंडाने टॉवरला बांधला.
दृष्टिक्षेप
- कोल्हापूर-गगनबावडा राज्यमार्गावर रस्त्यावरचा पाळणा
- वर्दळीमुळे पाळणा बनला होता धोकादायक
- सरिता मापन केंद्राची दुरवस्था
- रस्त्याच्या मधोमध येणारा हटवून बांधला टॉवरला
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.