crime against Jayant Patil BJP demand driving ST kolhapur sakal
कोल्हापूर

जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा; एसटी चालवल्याप्रकरणी भाजपची मागणी

पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला जुमानले नाही.

सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे चालकाची नियुक्ती नसताना, बॅच बिल्ला नसताना, जड वाहन चालक म्हणून अनुप्राप्ती नसताना तसेच कोणताही अनुभव नसताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहरातून एसटी बस चालवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी आज येथे भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पोलिसांकडे केली. पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण यांना निवेदन दिले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करावी, या भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाला जुमानले नाही. उद्याची वेळ मागून घेत उद्या संध्याकाळपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले.

वाळवा तालुका भाजपचे अध्यक्ष धैर्यशील मोरे, वाळवा तालुका भाजप ओबीसी सेलचे अध्यक्ष मधुकर हुबाले, तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांच्यासमवेत आज इस्लामपूर पोलिसात धाव घेतली. १५ ऑगस्टला आमदार जयंत पाटील हे तहसील कार्यालय चौकात आले होते. इस्लामपूर आगाराची विठाई बस (क्रमांक एमएच १३ सीयू ८१२२) सजवण्यात आली होती. ही बस पाहून ती चालवण्याचा मोह त्यांना आवरला नाही. काही अंतर त्यांनी बस चालवलीही. याप्रकरणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे बस चालकाची नियुक्ती नसताना, बस चालक म्हणून नियुक्ती होण्यासाठी आवश्यक असणारा आरटीओचा बॅच बिल्ला नसताना तसेच जड वाहन चालक म्हणून अनुप्राप्ती नसताना, कोणताही अनुभव नसताना बेकायदेशीररित्या इस्लामपूर शहरातून जयंत पाटील यांनी बस चालवली.

त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली. निवेदनावर धैर्यशील पाटील, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष सतेज पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत. यावेळी तालुका युवामोर्चाचे सरचिटणीस संदीप सावंत, जिल्हा भाजप चिटणीस संजय हवलदार, प्रवीण परीट, रामभाऊ शेवाळे, आबा मोरे, अक्षय कोळेकर, अक्षय पाटील, स्वप्नील कोरे, विकास परीट उपस्थित होते.

कायदेशीर बाबी तपासू : चव्हाण

आमदार जयंत पाटील यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करावा, यासाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक व आग्रही होते. त्यावर पोलिस निरीक्षक शशिकांत चव्हाण म्हणाले, ‘माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला थोडा वेळ द्या, कायदेशीर बाबी तपासून घेऊन मी पुढील प्रक्रिया करू.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अमित ठाकरेच आमदार होणार; मनसेला विश्वास

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT