crime case in kolhapur kamble from lenders in kolhapur special series 
कोल्हापूर

सावकारांचा जुगार अड्ड्यांवर डोळा ; तासांच्या बोलीवर होतोय कर्जपुरवठा

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जुगारात व्यसनाधीन झालेल्यांना टार्गेट करून दिवसापासून ते तासांच्या बोलीवर कर्ज देऊन खासगी सावकारांचा मालामाल होण्याचा प्रयत्न सुरू आहे. जुगार, मटका अड्डे, व्हिडिओ पार्लर, लॉटरी सेंटर अशा ठिकाणी सावज शोधून शिकार करणारी सावकारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. 

आज नाही तर उद्या डाव लागेल, दिवस पालटतील, मग सर्व देणी भागवू, असे म्हणत जुगारात माणूस अडकतच जातो. महिन्याच्या पगारासह घरातील शिल्लक, घरातील किमती वस्तूंपासून सर्व काही विकायचे; पण जुगार खेळायचाच, अशी त्याची मानसिकता बनते. अशा जुगारात बुडालेली व्यक्ती सकाळपासून रात्रीपर्यंत अड्ड्यावर पडून असते. त्याला जुगाराचा डाव पुढे खेळण्यासाठी दिवसाच्या अगर काही तासांच्या मुदतीसाठी पैशाची गरज भासते. त्याच्या याच गरजेचा फायदा उचलून खासगी सावकार गलेलठ्ठ बनू लागलेत. 

हे सावकार जुगार, मटका अड्ड्यासह ज्या ठिकाणी जुगार चालतो त्या ठिकाणी ठाण मांडून बसू लागलेत. त्यांच्याकडून जुगार खेळणाऱ्याला गरजेनुसार दिवसाच्या अगर तासांच्या बोलीवर १० ते ३० टक्‍के अशा पटीत मनमानी व्याजाने कर्जे दिली जातात. ते कोरे स्टॅम्प, कोरे धनादेश तारण म्हणून घेतात. जुगारात त्याला पैसे लागले तर व्याजासह जागेवर वसुली केली जाते; पण कर्जदार जुगारात हरला तर तारण घेतलेल्या कागदपत्राआधारे त्याची वसुली सुरू होते. जुगारात व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीच्या एका चुकीचा फटका त्याच्या संपूर्ण कुटुंबाला बसतो.

दिलेल्या भक्कम अशा तारणामुळे घरची मंडळीही सावकाराविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाहीत. परिणामी असे सावकार पडद्यामागे राहू लागलेत. जिल्ह्यातील अवैध व्यवसायांबाबत पोलिस प्रशासन दोन-तीन वर्षांत अधिक आक्रमक झाले तसे जिल्ह्यातील जुगार, मटक्‍या अड्ड्यांवर चांगलाच अंकुश बसला; पण छुप्या पद्धतीने सुरू असणाऱ्या जुगार अड्ड्यांवरील व्यसनाधीनांवर निशाणा साधण्यास खासगी सावकारांनी सुरवात केली आहे. असे छुपे जुगार अड्डे शोधून तेथील खासगी सावकारीची प्रवृत्ती पोलिसांनी वेळीच मोडून काढण्याची मागणी सर्वसामान्यांतून होत आहे. 

एजंटचाही वापर...

जुगार अड्ड्यातील व्यसनाधीनांना शोधून त्यांची शिकार करण्यासाठी खासगी सावकारांकडून एजंटचाही वापर केला जाऊ लागला आहे. असे एजंट जुगार अड्ड्यांवर थांबून जुगार खेळणाऱ्याला दिवसासह तासांच्या बोलीवर कर्ज देऊन मनमानी वसुलीही करू लागले आहेत.

संपादन - स्नेहल कदम 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Holiday: शाळांना ‘इलेक्शन डे’ सह तीन दिवस खरंच सुट्टीए का? शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण

Karad South Assembly Election : देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांना कराड तालुक्यात पाऊल ठेवून देणार नाही - शिवराज मोरे

SA vs IND 4th T20I: सूर्याने जिंकला टॉस! मालिका विजयासाठी टीम इंडिया, तर द. आफ्रिका बरोबरीसाठी सज्ज; पाहा Playing XI

Assembly Elections: 'एम' फॅक्टरचा कौल MVAच्या बाजूने, सर्वात मोठ्या संघटनेच्या पाठिंब्यानं बळ वाढलं, महायुतीला टेन्शन

Latest Maharashtra News Updates : पाशा पटेल यांच्या आक्षेपार्ह विधानावर काँग्रेसची टीका

SCROLL FOR NEXT