Baison Esakal
कोल्हापूर

‘जमावबंदी करून गव्याला वाट मोकळी करा’

नागरिकांच्या वारसांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : गवा आलेल्या गावात किंवा परिसरात एक-दोन तासासाठी जमावबंदी आदेश लागू करून गव्याला जंगलात पळून जाण्यासाठी वाट मोकळी करून दिली पाहिजे. गव्याला पकडण्यात किंवा फटाके फोडून पळवून लावण्यात काही अर्थ नाही. एखादी आपत्ती आल्यानंतर सर्व जण एकत्र येऊन काम करतात तसे वन विभागासह जिल्हा प्रशासन, पोलिसांसह इतर विभागांनी एकत्र येऊन वन्यप्राण्यांना जंगलात पाठवले पाहिजे, अशा सूचना राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी आज दिल्या. वन्यप्राण्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या वारसांना तत्काळ नुकसानभरपाई देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

शहर व परिसरात आलेल्या गव्यासंदर्भात लिमये यांनी आढावा घेतला. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. श्री. लिमये म्हणाले, ‘‘जिल्ह्यात आलेल्या गव्याला पकडू नका. त्याला हुसकावण्यासाठी फटाके फोडू नका. त्याला शांतपणे जंगलात जाण्यासाठी मार्ग द्या. गवा गावात किंवा शहर परिसरात आला असेल तर पोलिसांनी तेथील गर्दी कमी केली पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांनी गावात किंवा परिसरात गवा आला तर तेवढ्याच परिसरात तास ते दोन तास तातडीची जमावबंदी लागू करावी.

यामुळे लोकांची गर्दी होणार नाही. गर्दीमुळे गवा बिथरणार नाही. गवा लाजाळू आणि भित्रा आहे. त्याला पळवून लावण्यासाठी फटाके फोडणे किंवा आरडाओरड केल्यामुळे काहीही फायदा होत नाही. याउलट तो बिथरतो आणि हल्ला करू शकतो. त्यामुळे असे प्रयोग न करता पूर, भूकंप किंवा इतर आपत्ती आल्यानंतर सर्व शासकीय यंत्रणा एकत्र येऊन काम करतात, त्याच पद्धतीने एखादा प्राणी शहरात आला तर त्याला सुखरूप जंगलात पोचविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.’’

श्री. लिमये म्हणाले

मानवी वस्तीत वन्यप्राणी आले तर त्यांना पकडण्यासाठी काय करावे, यासाठी गुरुवारी किंवा शुक्रवारी वन अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेतली जाईल. यासाठी विशेष मार्गदर्शन करणारे पथक कोल्हापूरमध्ये येईल.

वाघांची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवली जात आहे. सागरेश्वर आणि पुण्यातील प्राणिसंग्रहालयात चितळ, सांबराची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढवली जाणार आहे.

महाराष्ट्रात सध्या ३०० वाघ आहेत. त्यापैकी चंद्रपूरमध्ये १५० आहेत. राजस्थान सरकारच्या मागणीवरून काही वाघांचे स्थलांतर केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT