आपण नेमके अंत्यसंस्कार केले तरी कोणावर असा प्रश्न नातेवाईकांना अखेर पडला.
कोल्हापूर - रूग्ण जिवंत असतानाही त्याचा मृत्यू झाला आहे असे गृहीत धरून अनोळखी मृतदेह नातेवाईकांच्या हाती देण्याचा गंभीर प्रकार रविवारी सीपीआरमध्ये उघडकीस आला. नातेवाईकांनी मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले नंतर सोमवारी दुपारी तुमचा रुग्ण जिवंत असल्याचा फोन आला नातेवाईकांना धक्का बसला. आपण नेमके अंत्यसंस्कार केले तरी कोणावर असा प्रश्न नातेवाईकांना अखेर पडला.
संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. ते मूळचे विजापूर परिसरातील आहे. संबंधित रुग्णास काही दिवसांपूर्वी सावित्रीबाई फुले रुग्णालयात दाखल केले गेले. नंतर सीपीआरमध्ये उपचार सुरू झाले. रविवारी दुपारी तुमच्या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा फोन नातेवाईकांना आला. संबंधिताची पत्नी तसेच नातेवाईक तातडीने सीपीआरच्या शवागृहात गेले. तेथे पत्नीला बोलावून मृताची ओळख पटविण्याचा प्रयत्न झाला. पत्नीला मृत्यृचा धक्का सहन झाला नाही. त्यांनी तेथेच हंबरडा फोडला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. नंतर मृतदेह घेऊन जोशीनगरच्या दिशेने निघून गेले. नातेवाईक तसेच गल्लीतील मंडळी दुःखात होती. सायंकाळी पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करून नातेवाईक घरी परतले. सोमवारी सकाळी रक्षाविसर्जनही झाले.
हक्काचा माणूस गेल्याचे दुःख होतेच. दुपारी अचानक तुमचा रुग्ण जिवंत असल्याचा फोन आला अन संबंधिताच्या सर्वांनाच धक्का बसला. सगळेजण धावत सीपीआरमध्ये गेले आणि पाहतात तर काय त्यांचा रुग्ण जिवंत आहे. काल ज्या डोळ्यात दुःखाचे अश्रु होते त्याच डोळ्यात आनंदाअश्रु तरळले. जो रुग्ण जिवंत त्याचा मृत्यू झाला आहे असे प्रमाणपत्र दिले गेले. त्या आधारे नारायण सदाशिव तुदिगाल (वय ३५) यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याची नोंदी स्मशानभूमीत झाली आहे.
दरम्यान सबंधित पोलिस अधिकाऱ्यांना विचारले सता पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार झालेली नाही. यासंबंधी तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
"या प्रकरणाची चौकशी केली जाईल. जो रुग्ण आहे जिवंत आहे, तो कोणत्या वॉर्डमध्ये दाखल आहे त्याची माहिती घेतली जाईल. दोषी असलेल्या संबंधितावर कारवाई होईल."
- डॉ. प्रदीप दीक्षित, राजर्षी शाहू वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.