कोल्हापूर

शाहूपुरीतील गणपती मूर्तीकारांना अजित पवारांकडून दिलासा

अर्चना बनगे

कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) शिरोळ चा दौरा करून नुकतेच कोल्हापुरात पोहोचले आहेत. कोल्हापुरातील शाहूपुरी (Shahupur) सहावी गल्लीत ते पाहणी करत आहेत. शाहूपुरी सहावी गल्लीत मोठ्या प्रमाणात गणपती मूर्तीकार राहतात.उद्भवलेल्या पूरस्थितीत मूर्तिकारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांना उपमुख्यमंत्र्यांनी मदतीचे आश्वासन दिले आहे. पूरग्रस्तांची पाहणी झाल्यानंतर आराखडा तयार करून पूरग्रस्तांसाठी कोणती मदत देता येईल याचा विचार करण्यात येईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे.(Deputy-Chief-Minister-Ajit-Pawar-shahupuri-Kumbhargalli-flood-visit-kolhapur- Live -update-akb84)

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा ,कोल्हापूर ,सांगली आणि कोकण अशी पाहणी अजित पवार यांनी केली आहे .मुख्यमंत्र्यांनी कोकणचा दौरा केला आहे .एकत्र बसून चर्चा करून लवकरात लवकर मदत दिली जाईल. आढावा घेऊन पूर्ण झालेला आहे. आराखडा तयार केला जाईल. पूरग्रस्तांसाठी यापुढे काय करता येईल याबाबत तातडीने निर्णय घेतला जाईल असे अजित पवार यांनी सांगितले.त्यांच्याबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्य आरोग्य मंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देऊन माहिती घेतली.

कोल्हापुरातील शाहूपुरीत मोठ्या प्रमाणात कुंभार समाज राहतो. या परिसरात गेले चार दिवस सात फूट पाणी आहे. कुंभार समाजाबरोबर व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेले आहे. जवळपास तीन महिने कोल्हापुरातील दुकाने बंद होती .आत्ता दुकाने उघडण्याची परवानगी मिळाली आहे. पण पावसाने मोठे नुकसान केले आहे. व्यापारी आपल्या व्यथा उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडत आहेत.

अजित पवारांचा नागरीकांशी संवाद

दरवर्षी शाहूपुरी कुंभार गल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात पूराचे पाणी येते. त्यामुळे इथल्या मूर्तिकारांना मोठा फटका बसतो.या ठिकाणी बांधकाम करण्यासाठी बँकांकडून कमी व्याजदराने लोन मिळावे, बांधकाम करत असताना उंची वाढवण्याची आणि जयंती नाल्यातील सांडपाण्याची व्यवस्था करावी अशी प्रमुख मागणी कुंभार बांधवांनी केली.

आधी कोरोना आता महापूर

कोल्हापुरात असे काही भाग आहेत ज्या ठिकाणी 2005 आणि 2019 साली पाणी आले नव्हते. त्या भागात सुद्धा पाणी आलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT