dhananjay mahadik will face assembly election 2024 by enabling the booth center
dhananjay mahadik will face assembly election 2024 by enabling the booth center Sakal
कोल्हापूर

Kolhapur : लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता..महाडिकांनी सांगितला विधानसभेच्या विजयाचा फॉर्म्युला

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी बूथ मजबूत केल्यास विधानसभा निवडणुकीला यश मिळवणे सोपे जाईल. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या विश्लेषणात फार काळ गुंतून न राहता आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले.

भाजपच्या जिल्हा कार्यालयात आज बूथ रचना कार्य योजना अभियानाच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. सर्व बूथ प्रमुख उपस्थित होते. खासदार महाडिक म्हणाले, ‘देशाच्या प्रधानमंत्रिपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी विराजमान झालेले आहेत.

समाजाच्या विकासासाठी हे सरकार निश्चितपणाने कटिबद्ध राहील.’ भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई, समन्वयक राहुल चिकोडे, माजी मंत्री भरमू सुबराव पाटील आदी उपस्थित होते.

जाधव यांनी नरेंद्र मोदी यांची तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. त्यास देसाई व महिला जिल्हाध्यक्ष रूपाराणी निकम यांनी अनुमोदन दिले. जिल्हा उपाध्यक्ष मेजर भिकाजी जाधव, के. एन. पाटील, हंबीरराव पाटील, हेमंत कोलेकर, संग्रामसिंह कुपेकर, संभाजी आरडे, राधानगरी अध्यक्ष विलास रणदिवे, भुदरगड अध्यक्ष अनिल तळकर,

करवीर अध्यक्ष दत्तात्रय मेडशिंगे, पन्हाळा अध्यक्ष मंदार परितकर, गगनबावडा अध्यक्ष स्वप्नील शिंदे, आजरा अध्यक्ष अनिरुद्ध केसरकर, अप्पा लाड, राजू मोरे, शैलेश पाटील, गणेश देसाई, उमा इंगळे, किरण नकाते, विजय खाडे, भरत काळे, रोहित पोवार, अमर साठे, राजसिंह शेळके, संगीता खाडे, प्रदीप उलपे, चंद्रकांत घाटगे आदी उपस्थित होते.

प्रारंभी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमाअंतर्गत कार्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण झाले. स्वागत महानगर सरचिटणीस डॉ. राजवर्धन यांनी केले. आभार जिल्हा सरचिटणीस नाथाजी पाटील यांनी मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Soren: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर हेमंत सोरेन पुन्हा होणार मुख्यमंत्री; चंपई सोरेन यांनी दिला राजीनामा

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजनेला भ्रष्टाचाराचे ग्रहण, पैसे घेणारा तलाठी निलंबित

Prithviraj Chavan: माझी लाडकी बहीण योजनेवरुन पृथ्वीराज चव्हाण कडाडले, वाचा काय म्हणाले माजी मुख्यमंत्री

IND vs ZIM: टी20 मालिका खेळण्यासाठी झिम्बाब्वेत पोहचलेल्या टीम इंडियाचं जोरदार स्वागत, पाहा Video

IND vs PAK Champions Trophy: लाहोरमध्ये पुन्हा होणार गदर... तारीख, दिवस ठरला! टीम इंडिया उखडणार पाकिस्तानची स्टम्प

SCROLL FOR NEXT