कोल्हापूर

दिलीपकुमार यांना पडली होती कोल्हापूरच्या गोडव्याची भुरळ

‘आदमी वही, कॅमेराभी वही, उसके अंदरकी फिल्म भी वही, लेकिन कहानीयॉं बदल गई है..'

संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : प्रसिध्द अभिनेते दिलीपकुमार (actor dilipkumar) यांना कोल्हापुरी चप्पल, धारोष्ण दूधच नव्हे तर कोल्हापुरी गुळाच्या (kolhapur) गोडव्यानेही भुरळ घातली होती. त्यांच्या एकूणच आयुष्यात ते चार ते पाच वेळा कोल्हापुरात आले. पण, या जिंदादिली माणसाने कोल्हापूरचा पाहुणचार मनसोक्तपणे स्वीकारला होता. खास 'सकाळ'ला दिलेल्या एका मुलाखतीत तर त्यांनी सिनेमाबाबत बोलताना ‘आदमी वही, कॅमेराभी वही, उसके अंदरकी फिल्म भी वही, लेकिन कहानीयॉं बदल गई है..' असे सांगत दिलखुलास संवाद साधला होता. त्यांच्या आज आयुष्याच्या रंगमंचावरून कायमची एक्झिट घेतली आणि या साऱ्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. (dilip-kumar-journey-he-came-to-kolhapur-share-memories)

पन्नास वर्षापूर्वी 'गोपी' या सिनेमाच्या (gopi film shooting) चित्रीकरणाच्या निमित्ताने दिलीपकुमार आणि वैजयंतीमाला (vaijyantimala) कोल्हापुरात होते. येथील विविध लोकेशन्सवर या सिनेमाचे चित्रीकरण झाले होते. पन्हाळ्याबरोबरच रूकडीच्या रेल्वेस्टेशन परिसरातही या चित्रपटातील अनेक प्रसंग चित्रीत झाले होते. तत्पूर्वी १९६६ मध्ये 'राम और शाम' (ram or sham) या त्यांच्या सिनेमाचे चित्रीकरणही पन्हाळा (panhala) येथे झाले होते. यावेळी त्यांच्यासह सायराबानू, चित्रतपस्वी भालजी पेंढारकर आदींनी कोल्हापूर जिल्हा फोटोग्राफर्स असोसिएशनलाही सदिच्छा भेट दिली होती.

१९८० साली दिलीपकुमार यांनी तत्कालीन विरोधी पक्ष नेते शरद पवार (sharad pawar) यांच्यासमवेत कोल्हापूर महापालिकेला भेट दिली होती आणि महापालिकेचे कामकाज समजून घेतले होते. कोल्हापूर महापालिकेतर्फे त्यांचा गौरवही झाला होता. त्यानंतर एक फेब्रुवारी १९९८ रोजी इचलकरंजी येथे झालेल्या फाय फाऊंडेशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यानिमित्ताने त्यांच्या निवासाची सोय येथील शालिनी पॅलेसमध्ये केली होती. यावेळी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT