विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) एकसंघपणे प्रचार करून महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे.
कोल्हापूर : भारतीय जनता पक्षामध्ये असणारी दुफळी विसर्जन मिरवणुकीच्या निमित्ताने अधोरेखित झाली. विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे (BJP) उमेदवार आणि माजी नगरसेवक सत्यजित कदम (Satyajeet Kadam) यांनी आपला स्वतंत्र स्वागत कक्ष उभारला होता. तर, भारतीय जनता पक्षाचा स्वतंत्र स्वागत कक्ष होता. पक्षामध्येही काही अंतर्गत वादामुळे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांपासून दुरावले असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election) एकसंघपणे प्रचार करून महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी भारतीय जनता पक्ष प्रयत्नशील आहे. यासाठी मतभेद विसरून एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन पक्षाचे नेते करीत आहेत, असे असताना ऐन गणेशोत्सवात भाजपमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. या मिरवणुकीत गणेश मंडळांशी संपर्क करण्यासाठी स्वागत कक्ष उभारले जातात. येथे मिरवणुकीतील मंडळाच्या अध्यक्षाला नारळ, पान, सुपारी देऊन सन्मानित केले जाते.
यासाठी प्रत्येक राजकीय पक्ष स्वागत कक्ष उभारतात. भारतीय जनता पक्षाचा स्वागत कक्ष येथे होता. भाजपचे पोटनिवडणुकीतील उमेदवार सत्यजित कदम यांनी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारला होता. आगामी विधानसभा निवडणुकीत ते भाजपकडून इच्छुक आहेत. पण, त्यांनी वेगळा कक्ष उभारल्याने पक्षातील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. पक्षामध्ये काही महिन्यांपासून जुने आणि नवे असा वाद सुरूच होता.
यामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना समजावून सांगत मतभेद दूर केले होते. मात्र, अद्याप कार्यकर्त्यांचे मनोमिलन झाले नसल्याचे दिसून येते. पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांचा एक गट शहरात स्वतंत्रपणे काम करीत असल्याचे दिसून येते. विविध नागरी प्रश्नांवर ते आवाज उठवून जनतेचे प्रश्न शासन दरबारी मांडत आहेत. एकूणच ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मतभेद पुढे आल्याने आता नेत्यांना मध्यस्थाची भूमिका बजावी लागणार आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरात मर्यादित कार्यकर्ते आहेत. तरीही त्यांच्यात असणारे दोन गट पाहायला मिळाले. राजू जाधव आणि राजू दिंडोर्ले यांनी स्वतंत्र स्वागत कक्ष उभारले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.