P.G.Shinde Esakal
कोल्हापूर

Bank Election: विद्यमान संचालक रिंगणाबाहेर ;सौभाग्यवती रिंगणात

जिल्हा बँकेचे राजकारण : पी. जी. बाहेर; सौभाग्यवती रिंगणात

सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : सलग दोनवेळा गगनबावडा विकास संस्था गटातून संचालक राहिलेल्या पी. जी. शिंदे (P.G.Shinde) यांनी विद्यमान संचालक असता निवडणुकीसाठी अर्जच भरला नाही. त्यांच्याऐवजी पत्नी लतिका यांनी महिला प्रतिनिधी गटातून अर्ज भरला आहे. आता शिंदे यांना सौभाग्यवतींना उमेदवारी मिळवून देण्याचे आव्हान असेल.

पूर्वी जिल्हा बँकेच्या संचालकांची संख्या २८ होती. २००८ मध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून सहकार कायद्यात काही बदल केले. त्यात संचालकांची संख्या २१ पेक्षा जास्त असू नये अशी तरतूद केली. परिणामी जिल्हा बँकेतील दूध संस्था प्रतिनिधी गटातील दोन, व्यक्ती सभासद, प्रक्रिया, पाणी पुरवठा, नागरी बँक, पतसंस्था अशा गटातून निवडून द्यायच्या जागा रद्द केल्या. विकास संस्था गटातील १२ जागा कायम ठेवून कृषी पणन व प्रक्रिया संस्थेतून दोन तर नागरी बँक-पतसंस्था, दूधसह पाणी पुरवठा व इतर संस्थांतून प्रत्येकी एक जागा निश्‍चित केल्या. याशिवाय दोन महिला प्रतिनिधी व भटक्या विमुक्त, अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातील प्रत्येकी एक जागा कायम राहिली.

विद्यमान संचालक असूनही शिंदे मात्र रिंगणाबाहेर राहणारे एकमेव संचालक आहेत. त्यांच्या पत्नी लतिका यांचा अर्ज महिला गटातून दाखल झाला आहे.

शिंदे यांच्यापूर्वी संचालक असूनही अर्ज न दाखल केलेल्या पालकमंत्री सतेज पाटील, ज्येष्ठ उद्योजक व्ही. बी. पाटील, प्रकाश आवाडे, अमर यशवंत पाटील, भय्यासाहेब कुपेकर आदींनीही संचालकांची संख्या कमी झाल्याने रिंगणाबाहेर थांबणे पसंत केले. तत्पूर्वी पालकमंत्री पाटील व्यक्ती सभासद गटातून, व्ही. बी. पाणी पुरवठा संस्था गटातून, आवाडे नागरी बँक गटातून तर भय्यासाहेब कुपेकर दूध संस्था गटातून संचालक झाले होते.

यावेळी सर्वच संचालकांचे अर्ज दाखल झाले आहेत. लढत कोणत्या तालुक्यात होईल हे सांगता येत नाही पण विद्यमान संचालक असूनही शिंदे मात्र रिंगणाबाहेर राहणारे एकमेव संचालक आहेत. त्यांच्या पत्नी लतिका यांचा अर्ज महिला गटातून दाखल झाला आहे. सौ. शिंदे यांना उमेदवारी देण्याच्या अटीवरच शिंदे यांनी न लढण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.

शिंदे अध्यक्ष असतानाच कारवाई

जिल्हा बँकेवर १३ नोव्हेंबर २००९ ला प्रशासक नियुक्ती झाली. त्या वेळी बँकेचे अध्यक्ष शिंदे होते. ‘दत्त-आसुर्ले’ साखर कारखाना तत्कालिन सहकार आयुक्तांनी अवसायानात काढल्याने त्या कारखान्याच्या कर्जापोटी कराव्या लागलेल्या एनपीए तरतुदीमुळे ही कारवाई झाली होती. त्यानंतर तब्बल सहा वर्षांनी म्हणजे मे २०१५ मध्ये संचालक मंडळ अस्तित्वात आले. २००९ मध्ये सुरुवातीला विभागीय सहनिबंधक प्रशासक म्हणून काही काळ होते, वर्षभरानंतर या पदावर प्रताप चव्हाण यांची कायम नेमणूक झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT