Kolhapur Flood esakal
कोल्हापूर

Kolhapur : शहरासह ग्रामीण भागातील 'रेड लाईन'मधील बेकायदा बांधकामे पाडा; विभागीय आयुक्तांच्या प्रशासनाला सूचना

Kolhapur Flood Chandrakant Pulkundwar : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पिलर ब्रिजबाबत पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करावा.

सकाळ डिजिटल टीम

घरांची पडझड, शेतीचे नुकसान याचे पंचनामे करताना चित्रीकरण करा. पुराचे पाणी ओसरल्यावर तत्काळ पंचनामे सुरू करा, अशी सूचना बैठकीदरम्यान केल्याचे पुलकुंडवार यांनी सांगितले.

कोल्हापूर : शहर आणि ग्रामीण भागातील रेड लाईनमधील (Red line) बांधकामांची पाहणी करा, त्यामधील बेकायदेशीर बांधकामे पाडा, अशी सूचना विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार (Chandrakant Pulkundwar) यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ते म्हणाले, ‘‘रेड झोनमधील बांधकाम परवाने डोळ्यात तेल घालून पाहा आणि रोखा.’’

त्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत बैठक झाली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते. त्यानंतर पुलकुंडवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते म्हणाले, ‘‘राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाशी पिलर ब्रिजबाबत पत्रव्यवहार करून त्याचा पाठपुरावा करावा. जिल्ह्यातील परस्पर समन्वयाने महापुराची तीव्रता वाढली नाही. दोन्ही राज्यांतील समन्वयाने आलमट्टी धरणातील विसर्गही व्यवस्थित झाला; मात्र, भविष्यात पुराची तीव्रता वाढू नये, यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

रेडझोनमधील बेकायदेशीर बांधकामे पाडा. रेडझोनमध्ये बांधकामांना परवानगी मिळणार नाही, यासाठी डोळ्यात तेल घालून पाहा. नदीकाठी असणारी लहान गावेही आता मोठी झाली आहेत. तेथील रेड आणि ब्ल्यू लाईनमधील बांधकामांची पाहणी करा. ब्ल्यू लाईनमधील पूर्वीच्या बांधकामांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यासंदर्भात नवे धोरण ठरवण्याचा विचार सरू आहे.’

पंचनाम्यांचे चित्रीकरण करा

घरांची पडझड, शेतीचे नुकसान याचे पंचनामे करताना चित्रीकरण करा. पुराचे पाणी ओसरल्यावर तत्काळ पंचनामे सुरू करा, अशी सूचना बैठकीदरम्यान केल्याचे पुलकुंडवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT