dogs demand German Shepherd Husky Rottweiler kolhapur sakal
कोल्हापूर

श्‍वानांची वाढली देवाण-घेवाण; हाऊंड श्‍वानांना सर्वाधिक मागणी

जर्मन शेफर्ड, हस्की, रॉटविलरलाही पसंती

सुयोग घाटगे

कोल्हापूर : श्‍वानप्रेमी आवडते श्‍वान मिळविण्यासाठी लाखो रुपये खर्च करतात. त्यांची निगा राखली जाते. घराच्या रक्षणार्थ एवढाच राहिलेला श्‍वानाचा वापर हा कुटुंबाचा स्टेटस सिम्बॉल बनत आहे. कोल्हापूरचे हौशी श्‍वानप्रेमी लाखो रुपये खर्चून अन्य राज्यांतून श्‍वानांची आयात करत आहेत.कोल्हापूरकरांचे श्वान प्रेम शेकडो वर्षांपासूनचे आहे. येथील छत्रपती घराण्यातही श्‍वान पालनाची जुनी परंपरा आहे. शिकार, शर्यत असा वापर असणाऱ्या श्‍वानापासून ते आताच्या जातिवंत नि रुबाबदार श्‍वानांची रेलचेल नव्या राजवाड्यात असते.

शर्यतीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या हाऊंड जातीच्या श्‍वानांची सर्वात जास्त आयात केली जाते. तर जर्मन शेफर्ड, हस्की, रॉटविलर, ग्रेट डेन, लॅब, गोल्डन रिट्रीवर, पग यातील चॅम्पियन ब्रीड असणाऱ्या श्‍वानांच्या अपत्याला अधिक मागणी आहे. रेडिसन रिजेबॅक व सयबेरियन हस्की यांचे एकत्रित ब्रिडिंग केलेले रिजबोस्की हे एकमेव श्वान याच कोल्हापूरमध्ये आहे. हैदराबाद, पंजाब, कर्नाटक, दिल्ली, हरियाणा येथून जातिवंत श्‍वानांची पिले आयात केली जातात. तर कोल्हापूर येथून देखील श्‍वानाच्या पिलांची निर्यात केली जात आहे. काही हजार रुपयांपासून ते लाखो रुपये या श्‍वान खरेदीसाठी मोजले जातात. तसेच यासाठी लागणारे सर्व कागदोपत्री व्यवहार, मॅनेजमेंट, औषधोपचार, इंजेक्शन आणि खाद्य याची नियमावलीदेखील ठरलेली असते. सध्या कर्नाटकातील बंगळूर, मुधोळ, बेळगाव, हैदराबाद येथून हैदराबाद शहर व परिसरातून, तर दिल्ली आणि हरियाणामध्ये भरणाऱ्या श्‍वानाच्या बाजारातून हे श्‍वान आणले जात आहेत.

मुधोळ हाऊंड शर्यतीसाठी

हाऊंड जातीचे मुधोळ हाऊंड हे चपळ आणि अधिक वेगाने धावणारे श्वान म्हणून ओळखले जाते. विशेषतः शर्यतीसाठी याचा सर्वाधिक वापर केला जातो. किंग अथवा क्वीन ऑफ रेसिंग असे संबोधलेले अनेक व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमावर झळकत आहेत. शर्यतीसाठी म्हणून या श्वानांना पसंद केले जात असल्याचे यावरून दिसून येत आहे.

श्‍वान वाढवते घराची शोभा

जातिवंत आणि रुबाबदार श्‍वान ही घराची शोभा वाढवते, असा नवा बदल सध्या श्वानप्रेमींत दिसत आहे. यामुळे ऊलिकोट हस्की, रॉटविलर आणि ग्रेट डेन जातीचे श्‍वान श्‍वानप्रेमींच्या घरामध्ये सहज वावरताना दिसत आहेत.

लॉकडाऊन नंतरच्या कालावधीत श्‍वानांच्या मागणीत अधिक वाढ झाली आहे. उच्च प्रतीच्या आणि जातिवंत श्‍वानाला सर्वाधिक मागणी असून, सातत्याने श्‍वानांच्या पिलांबाबतची विचारणा होत आहे.

- मारुती देसाई, व्यावसायिक, कर्नाटक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Vidhan Sabha Election: मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर जिल्ह्यात विक्रमी मतदान; 2009 च्या निवडणुकीत 60 टक्के, तर यंदा 69.12 टक्क्यांवर

आलिया कपडे बदलत असताना तो सतत तिच्यावर... इम्तियाज अली यांनी सांगितली ती घटना; म्हणाले- त्याला मी पाहिलं तेव्हा

Sangli MIDC Fire : सांगली एमआयडीसीतील केमिकल कंपनीत वायू गळती; दोघांचा मृत्यू, 10 जणांची अवस्था गंभीर

Nashik Police : मतमोजणी केंद्राभोवती कडेकोट सुरक्षा तैनात; सशस्त्र आयटीबीपीची करडी नजर

IPL Schedule: क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! पुढील 3 हंगामाच्या तारखा BCCI ने केल्या जाहीर

SCROLL FOR NEXT